भडगाव( संजय महाजन)
भारत मातेचे रक्षण करणारे खान्देश चे सुपुत्र यांनी रक्षाबंधन निमित्ताने गरीब बहिणीस दिलेली भेट.
मळगाव गावातील आदिवासी समाजातील शेतकरी बाई यांची जमीन तांदुळवाडी शिवारात गट नं.९०/२ असून तेथील बुद्धीहीन दारुड्या माथेफेरू याने २ एकर च्या आसपास कपाशी उपटून नासधूस केली ही बातमी एवढी वाऱ्यासारखी पसरल्याने गरीब आदिवासी विधवा परित्यक्ता मोलमजुरी करणारी ग.भा.मीराबाई गायकवाड यांचा आक्रोश पाहून जळगाव जिल्ह्यातील खान्देश चे सुपुत्र भारत मातेचे रक्षण करणारे व अहोरात्र देशासाठी डोळ्यात तेल भरून आपल्या परिवाराचा विचार न करता देशेच्या सीमेवर लढत असतांना देखील खान्देश चे सुपुत्र, सैनिक, माजी सैनिक, पोलीस दलातील जवानांनी आपली पाठीची बहीण अथवा रक्ताचे नाते समजून १२,५०१ रु. व पैठणी साडी चोळी बहिणीस मदत स्वरूपात भेट दिली.
त्याप्रसंगी जळगाव जिल्यातील आजी माजी सैनिक दल, सीमेवर लढणारे जवान, पोलीस दलातील जवान यांनी मॅसेज च्या स्वरूपात रडत असणाऱ्या बहिणीचे अश्रू पुसले. तसेच गावातील सरपंच सीताराम पवार, पोलीस पाटील किरण बागुल, तंटामुक्ती अध्यक्ष जयवंतराव पाटील, समाजसेवक सिद्धार्थ बागुल, उपसरपंच सूर्यकांत पाटील, बाप्पू नाईक, मुरलीधर खैरनार, पत्रकार प्रल्हाद पवार, गावातील जेष्ठ नागरिक व नवतरुण उपस्थित होते.