मिरज( संजय पवार ):-शिक्षक भरती सांगली जिल्ह्याच्या वतीने 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनी शिक्षकांच्या विविध मागण्यांसंदर्भात आंदोलन करण्यात येत आहे. मा. शिक्षणाधिकारी विष्णू कांबळे यांना शिक्षक भारती संघटनेच्यावतीने प्रत्यक्ष भेटून ,चर्चा करून ,वारंवार निवेदने देऊन निवेदनांचा पाठपुरावा करूनही माध्यमिक विभागाने संघटनेच्या मागण्यांसंदर्भात विचार केलेला दिसत नाही. माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे पगार राष्ट्रीयकृत बँकेत व्हावेत , याबाबत शिक्षण विभागाने कोणताही ठोस निर्णय न घेतल्याने 15 ऑगस्ट या स्वातंत्र्य दिनी शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे पगार राष्ट्रीयकृत बँकेत व्हावेत डी. सी.पी. एस. व एन. पी. एस. धारकांच्या मागण्यांची पूर्तता त्वरित करावी, वरिष्ठ व निवड वेतन श्रेणी बाबत विनाविलंब कार्यवाही व्हावी, ए. टी.डी.टू ए.एम. वेतनश्रेणी प्रस्तावांना विनाविलंब मान्यता देण्यात याव्यात यासंदर्भातील निवेदन माननीय उपशिक्षणाधिकारी नामदेव माळी यांच्याकडे देण्यात आले यावेळी सुधाकर माने, आशिष यमगर, संजय पवार ,रतन कुंभार ,अशोक मासाळ, सुरेश संकपाळ, दीपक संकपाळ उपस्थित होते.