भडगाव (संजय महाजन )जवळ जवळ अठरा महिन्यांनी ग्रामीण भागातील शाळांची घंटा वाजली. शाळा पुन्हा सुरू झाल्या आहेत कोविड चे नियम सांभाळून ग्रामीण भागात ८वी तें १२वि पर्यतच्या शाळा भरविण्यात येत आहेत .
नुकताच १० वी व १२ वी चा निकाल लागला. शाळा सुरू झाल्याने ब. ज. हिरण विद्यालयात १० व १२ वि उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला महात्मा गांधी विद्या प्रसारक मंडळ संचिलित बबनबाई जवरीलाल हिरण विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय यात संपन्न झाला कार्यक्रमा च्या अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष दिनकरराव पाटील होते. त्यांच्या हस्ते विध्यार्थी चा सत्कार करण्यात आला .यावेळी महात्मा गांधी विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मंगेश पाटील सचिव रत्नाताई पाटील यांनी भ्रमणध्वनी च्या माध्यमातून शुभेच्छा संदेश दिला.
दहावी च्या वर्गातून प्रथम आलेला चैतन्या मनोज पाटील तर द्वितीय क्रमांकाने आलेल्या साक्षी प्रदीप पाटील तृतीय क्रमांकाने आलेल्या साक्षी परमेश्वर पाटील व मिलिंन अशोक महाजन व १२ वी च्या परीक्षेत प्रथम आलेल्या रिंकू विजय पाटील द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या लक्ष्मी विजय साठे व त्रितीय आलेला प्रशांत आशोक सोनवणे यांचा देखील सन्मान केला यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक यांनी उपस्थितांना विविध बाबतीत मार्गदर्शन केले यावेळी संस्थेचे जेष्ठ संचालक धर्मसिंग पाटील स्वनील पाटील ,सुनील पाटील गुणवंतांचे पालक व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. यावेळी आभार एस. एस. केदार यांनी मानले.