लातूर (सोमनाथ काजळे)जिजामाता विद्यालयाच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी विद्यार्थ्यांना पेढा भरवून सत्कार केला.
जिजामाता विद्यालयाचा सलग पाचव्या वर्षी100% निकाल लागला .जिजामाता विद्यालयाने निकालाची परंपरा कायम राखत घवघवीत यश संपादन केले .दहावी परीक्षेत एकूण 62 विद्यार्थी बसले होते. त्यपैकी50 विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले व12 विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. विद्यालयातून स्नेहल साळूंके प्रथम ,प्रेमकुमार डागा द्वितीय तर अजिंक्य गिरी याने तिसरा क्रमांक मिळविला आहे. गुणवंत विद्यार्थ्यांचे शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी पेढा भरवून सत्कार केला.
या प्रसंगी जिजामाता विद्यालयाच्या प्राचार्या सलीमा सय्यद, श्री. बदरूलहक सय्यद ,मुख्याध्यापिका सायुजता खंदारे, प्रा. बाबासाहेब सोनवणे, प्रा.दत्तत्रय मुंडे,सर्व शिक्षक प्राध्यापक व कर्मचार्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.