लोहारा (प्रतिनिधी)–येथे अतिवृष्टीने झालेल्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याची सुरुवात ४नोव्हेंबर रोजी प्रत्यक्ष शेतात जाऊन करण्यात आली.
यावेळी कृषी सहाय्यक जोहरे, तलाठी नदीम शेख,कोतवाल राजेंद्र सुर्वे यांना नाना माळी, मोतीलाल जाधव यांचेसह लोहारा, कळमसरा गावातील शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन मका,ज्वारी, कापूस,मिरची ,वांगे सह विविध पिकांचे नुकसान झाल्याचे पंचनामा पाहणीत दिसून आले.अतिवृष्टीने लोहारा सह परिसरातील १००टक्के शेतकऱ्यांचे सर्वच पिकांचे नुकसान झालेले आहे.लोहारा येथील १७००हेक्टरवरील पिकांचे अतिवृष्टीने नुकसान केलेले आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना शासनाकडून नुकसान भरपाई मिळण्यासाठी शासनाकडे तसा अहवाल व पंचनामे पाठविण्यात येणार आहेत, अशी माहिती तलाठी नदीम शेख व कृषी सहाय्यक जोहरे यांनी दिली.सर्व शेतकरी बांधवांनी पिक-पेऱ्यांची माहिती तलाठी कार्यालयात द्यावी,असे आवाहन करण्यात आले.
यावेळी पंचनामे करतांना तलाठी नदीम शेख,कृषी सहाय्यक जोहरे,लोहारा उपसरपंच कैलास चौधरी, ग्रामपंचायत सदस्य राजू भदाणे,सुनिल क्षिरसागर, नितीन परदेशी, नाना माळी,पत्रकार दिपक पवार,जयेंद्र सूर्यवंशी आदी हजर होते.
शासनाने पंचनामे करून तात्काळ मदत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात टाकावी,अशी मागणी शेतकरी बांधवांनी केली आहे.

दिपक पवार, लोहार