शेदुणी जवळ खाजगी बस उलटली प्रवासी बचावले:पांच जण किरकोळ दुखापत सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेश सिंग परदेशी त्यांच्या सहकाऱ्यांनी., प्रवाशांची चहा पाण्याची व्यवस्था करून सुखरूप रवाना केले.

पहुर :- जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी गावाजवळ खाजगी बस पुण्याकडे जात असताना पलटी झाल्याने त्यात पाच जण जखमी झाले आहे रात्री रविवारी ही घटना घडली असून यात कोणतीही जिवंत हानी झाली नाहीजामनेर शेंदुर्णी मार्गे पुणे येथे जाणारी साईराम ट्रॅव्हल्स एम एच 19 वाय 330 3 क्रमांक खाजगी बस रविवारी रात्री जात असताना माली फुली जवळ पलटली तीन महिला दोन पुरुष असे पाच जण जखमी झाले आहे बस मध्ये अंदाजे तीस ते पस्तीस प्रवाशी बसले होते पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेश सिंग परदेशी यांना तात्काळ माहिती मिळाले असता आपल्या सहकाऱ्यांसोबत घटनास्थळी जाऊन सर्व जखमींना रुग्णालयात उपचारार्थ पाचोरा येथे दाखल केले तसेच उर्वरित प्रवाशांना शेंदुर्णी जवळ सत्कार हॉटेल जवळ थांबून या सर्व प्रवाशांना चहा पाण्याची व्यवस्था करून तसेच पुण्याकडे सुखरूप रवाना केले पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत मदत कार्य करून सर्व प्रवाशांना सहकार्य केले यात पोलीस उपनिरीक्षक अमोल दिवटे कॉन्स्टेबल प्रवीण देशमुख ईश्वर देशमुख अनिल अहिरे नाना देशमुख या कर्मचाऱ्यांनी प्रवाशांना सहकार्य केले