अकलुज : वार्ताहर
विधानसभेच्या निवडणुका झाल्या परंतु सरकार स्थापनेचा तिढा अद्यापही सुटू शकला नाही. राज्यभरात सरकार स्थापनेवरून भाजप महायुतीचा सावळा गोंधळ असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी युतीचे सरकार येणार असल्याचे सांगून लवकरच सत्ता स्थापन करण्याचा मनसुबा बोलून दाखवला परंतु लोकसभेच्या निवडणुकीवेळी महायुतीतील शिवसेनेला दिलेल्या आश्वासनांचा या विधानसभेला विचार न झाल्यामुळे सेनेने वेगळी चुल मांडून महाआघाडी सोबत घेऊन सेनेचा मुख्यमंत्री करून सरकार स्थापन करण्याची तयारी ठेवली आहे यामुळे भाजपाच्या गोटात एकच खळबळ उडाली आहे. दिलेला शब्द न पाळणारे व शिवसेनेची फसवणूक करणारे महाराष्ट्राचे फसवे मुख्यमंत्री फडणवीस यांना सदबुद्धी देण्यासाठी त्यांच्याच कुलदैवताला श्री क्षेत्र नृसिंह नीरा नरसिंहपुर या ठिकाणी युवा सेना माळशिरस तालुक्याच्या वतीने संगम पासून पायी दिंडी काढून व महाआरती करुण शिवसेनेचे युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे हे भावी मुख्यमंत्री व्हावेत या साठी नृसिंह चरणी युवा सेना माळशिरस तालुका प्रमुख गणेश इंगळे , उपजिल्हा प्रमुख सोनू पराडे पाटिल , शहराध्यक्ष शेखर खिलारे यांच्या नेेतृत्वाखाली असंख्य युवा सैनिंकानी साकडे घातले

या पायी दिंडी मध्ये महादेव बंडगर , पिंटू तात्या चव्हाण , नाना पराडे , सागर इंगळे , भैय्या पराडे , चंदू पराडे , मिलिंद मोरे , अमर सरवदे , आबा महाडिक , बबन पराडे , कल्याण इंगळे , दत्ता साळुंखे , लाला भोई , नवनाथ इंगळे , अक्षय पराडे , विकी पराडे , शिवबा खिलारे यांच्यासह युवासेना व शिवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कृष्णा लावंड