लातूर/प्रतिनीधी- सोमनाथ काजळे
लातूर शहरातील एमआयडीसी परिसरात असलेल्या जिजामाता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात स्वतंत्र भारताचा 73 वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. यावेळी मराठवाड्याचे लोकप्रिय शिक्षक आमदार विक्रमजी काळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून माजी कुलगुरू प्राचार्य मधुकरराव गायकवाड हे उपस्थित होते.कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे प्रत्यक्ष विद्यालयात न येता विद्यार्थ्यांना हा कार्यक्रम ऑनलाईन स्वरूपात घरीच पाहता आला.
सामाजिक अंतराचे नियम ठेवून घेण्यात आलेल्या या कार्यक्रमास विद्यालयातील प्राचार्य देविदास कोल्हे, प्रा. सुनील नावाडे, बाबासाहेब सोनवणे, राजकुमार शिंदे, बाळासाहेब बावणे, वैशाली फुले, संतोष जोहरी, सायुजेता खंदारे, भाग्यशाली गुडे, वैशाली वाघमारे,शंकर पांचाळ, गोकुळ मतकंटे,सुभाष म्हेत्रे, बालाजी साबळे, राजाभाऊ वाघमारे, सोनल आवाळे इ.उपस्थित होते.