जामनेर-उपसंपादक-शांताराम झाल्टे
संत श्री संताजी महाराज जगनाडे यांची 397 वी जयंती मोठ्या संख्येने वाकी खु.ग्रामपंचायत येथे साजरी करण्यात आली.
संत श्री संताजी जगनाडे महाराज यांचा जन्म ८ डिसेंबर १६२४ रोजी महाराष्ट्र राज्यात पुणे जिल्ह्यातल्या मावळ तालुक्यातील सुदुंबरे या गावी विठोबा जगनाडे यांच्या घरी झाला.
विठोबा जगनाडे व आई माथाबाई हे विठ्ठलभक्त होते, त्यामुळे संताजींवर लहानपणापासूनच धार्मिक संस्कार झाले.
तेल्याचे घर असल्यामुळे मुलांला हिशोब करता येणे गरजेचेच असते त्यामुळे संताजी महाराजांना देखील लिहिता वाचता आणि हिशोब करता येईल एवढे शिक्षण घेतले होते.
घरची परिस्थिती चांगली होती त्यामुळे संताजी महाराजांना कसली कमी पडली नाही संताजींवर लहानपणापासूनच धार्मिक संस्कार झाले. कीर्तनाला, भजनाला जाण्याची सवय लागली.
कीर्तनाची आवड त्यांच्यात बालपणीच निर्माण झाल्यामुळेच ते नंतर संत तुकाराम महाराजांच्या चवदा टाळकऱ्या पैकी एक झाले.
अशाप्रकारे थोडक्यात माहिती गावातील संरपच श्री सुधाकर गंगाराम सुरवाडे यांनी सदस्य व ग्रामस्थांना दिली.
संत शिरोमणी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून 397 वी जयंती साजरी करण्यात आली.
याठिकाणी उपस्थित जेष्ठ नागरिक श्री रघुनाथ माधव सरताळे,मुकेश प्रकाश सरताळे, वाकी खु.सरपंच श्री सुधाकर सुरवाडे, उपसरपंच पुनम योगेश ढाकरे,ग्रामसेवक राजू पुंडलिक बोडखे, सदस्य ईश्वर बाबुलाल तेली, अंबादास जगन नरवाडे,बापु लक्ष्मण पाटील,कविता संदीप झलवार,आरती शिवाजी तेली,शिपाई अजय झुंबरलाल तेली,प्रदीप जिवनलाल सरताळे,तसेच गामस्थ मंडळी,पदाधिकारी समाज बांधव उपस्थित होते.
वाकी खु.ग्रामपंचायती मध्ये संत श्री संताजी महाराज जगनाडे यांची 397 वी जयंती साजरी
