गारखेडे/प्रतिनिधी-सुनिल चौधरी
संत शिरोमणी जगनाडे महाराज यांची 397 वी जयंती साजरी करण्यात आली
संत श्री संताजी जगनाडे महाराज यांचा जन्म ८ डिसेंबर १६२४ रोजी महाराष्ट्र राज्यात पुणे जिल्ह्यातल्या मावळ तालुक्यातील सुदुंबरे या गावी विठोबा जगनाडे यांच्या घरी झाला. विठोबा जगनाडे व आई माथाबाई हे विठ्ठलभक्त होते, त्यामुळे संताजींवर लहानपणापासूनच धार्मिक संस्कार झाले. तेल्याचे घर असल्यामुळे मुलांला हिशोब करता येणे गरजेचेच असते त्यामुळे संताजी महाराजांना देखील लिहिता वाचता आणि हिशोब करता येईल एवढे शिक्षण घेतले होते. घरची परिस्थिती चांगली होती त्यामुळे संताजी महाराजांना कसली कमी पडली नाही संताजींवर लहानपणापासूनच धार्मिक संस्कार झाले. कीर्तनाला, भजनाला जाण्याची सवय लागली. कीर्तनाची आवड त्यांच्यात बालपणीच निर्माण झाल्यामुळेच ते नंतर संत तुकाराम महाराजांच्या चवदा टाळकऱ्या पैकी एक
संत शिरोमणी जगनाडे महाराज यांची 397 वी जयंती साजरी करण्यात आली व उपस्थित सरपंच व उप सरपंच .सदस्य व ग्रामसेवक .गावकरी मंडळी व समाज बांधव उपस्थित होते
