जामनेर/उपसंपादक-शांताराम झाल्टे
जामनेर येथे अपंग पुनर्वसित विकास बहुउद्देशी संस्थेच्या व जागृत दिव्यांग संघटनेच्या वतीने दि.३ डिसेंबर २०२१ रोजी भव्य दिव्यांग मेळावा आयोजित करण्यात आले असून
जामनेर तालुक्यातील सर्व अपंग बांधवांना जागृत अपंग सघटने मार्फत आव्हान करण्यात येत आहे.
३डिसेंबर हा जागतिक अपंग दिनाचे औचित्य साधून अपंगांच्या विविध समस्यांची जाणीव करून घेण्यासाठी तसेच त्यांना योजनेंची माहिती देण्यासाठी मार्गदर्शन क्षेत्रातील पदाधिकारी येनार आहेत.
या वेळी मेळाव्या मध्ये अध्यक्ष विश्वनाथभाऊ सुरळकर,उपाध्यक्ष गणेश साळुंखे, सचिव युवराज मगरे,प्रसिद्धी प्रमुख अलियार खान,महिलाध्यक्ष उषाबाई पाटील, सदस्य कैलास कोळी,निलेश सिसोदे,दरबार चव्हाण, विलास खरात,उपस्थिती असून जामनेर तालुक्यातील सर्व सरपंचांना विनंती केली जात आहे की आपल्या गावातील अपंग बांधवांना माहिती देण्यात यावी अशी जागृत दिव्यांग संघटने कडून विनंती केली जात आहे.
अंपग पुनर्वसित विकास बहुउद्देशी संस्था व जागृत दिव्यांग संघटनेच्या वतीने जामनेर येथे भव्य दिव्यांग मेळावा आयोजित
