🔺
लोहारा/प्रतिनिधी-आत्माराम पाटील

लोहारा येथील डॉ. जेजी पंडित विद्यालय आणि शेंदुर्णी येथील आचार्य गजाननराव गरूड विद्यालयाचे माजी विद्यार्थी अर्जुनभोई यांना सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रात आपले योगदान दिल्याबद्दल राजनंदिनी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, जळगांव यांच्या माध्यमातून त्यांच्या संस्थेचा सर्वोच्च सन्मान खान्देशभूषण हा रविवार दिनांक ५/१२/२०२१ रोजी अल्पबचत भवन, कलेक्टर आँफीस जळगाव येथे देऊन सन्मानित करण्यात येत आहे. लोहारा सुपुत्र अर्जुनभोई यांनी आपल्याला अनेक पातळ्यांवर आपल्या सेवाभावी कार्यातून स्वत:ला सिध्द केले आहे. खान्देश भूषण या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात येत असल्यामुळे लोहारा परिसरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. आज पर्यंत त्यांना राज्यात तसेच राज्याबाहेर ही अनेक मान सन्मानाने सन्मानित करण्यात आले आहे त्यात भिवंडी येथे बाराबलुतेदार महासंघाचा महाराष्ट्र समाज भूषण, पुणे येथे राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार, पुणे येथे मल्लाव समाज सन्मान, नागपूर येथे समाज मित्र, भोई गौरव सन्मान, नवी दिल्ली येथे समाज साथी, धुळे येथे भोई समाज भूषण, मध्यप्रदेश शिवपुरी येथे समाज साथी … अशा दशकाच्या पटीतील अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.