जामनेर/प्रतिनिधी-शांंताराम झाल्टे

त्रिरत्न बुद्ध विहार ,सम्राट अशोक नगर जामनेर येथील विहारात २६नोव्हेंबर २०२१रोजी भारतीयांच्या अस्मितेचा मंगलमय दिवस अर्थात ७२वा संविधान दिन साजरा करण्यात आला,प्रसंगी महिला भगिणीनी मधुर आवाजात त्रिसरण -पंचशिल म्हटले,नंतर मुलांनी गीतगायन व भाषणे दिली,आयु.प्रविण तायडे सर,आयु.अतुल सुरवाडे, आयु.युवराज सुरळकर सर यांनी मनोगत व्यक्त केले, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आयु.बी.एस.निकम सर होते,त्यांच्या अध्यक्षीय भाषणातून त्यांनी संविधानाचे महत्व सांगितले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आयु.गोकुळ जोहरे सर,व आभार प्रदर्शन आयु.दिपक पटवर्धन सर यांनी केले, कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी आयु.विजय वाघ सर,शेषराव सावळे सर,एकनाथ सुरवाडे सर आयु.बापू भिमडे सर,दिवाकर म्हस्के सर,दिपक कांबळे सर,विनोद सुरवाडे सर,प्रदिप सुरवाडे सर,विशेषतः महिला वर्गाने परिश्रम घेतले,शेवटी सरणतंय घेऊन कार्यक्रमाची सांगता झाली.