जामनेर/उपसंपादक-शांताराम झाल्टे
मा.जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या आदेशानुसार कोरोना लसीकरण जिल्हाधिकारी, व मुख्यकार्यकारी अधिकारी, न.पा.,गटविकास अधिकारी, तालुका वैद्यकीय अधिकारी, बालविकास प्रकल्प अधिकारी, गटशिक्षणाधिकारी,
ग्रामसेवक,यांची दैनंदिन आढावा बैठक घेऊन
ग्रामपंचायत कार्यालय जंगीपुरा व जि.प. शाळा जंगीपुरा यांच्या संयुक्त विदयमानाने संविधान दिन साजरा करण्यात आला.
असून लोकनियुक्त सरपंच सौ.कविता इच्छाराम राजपूत यांनी घोषणा केली की कोवीड १९ अंतर्गत पहीला डोस ९९ टक्के पूर्ण झाला आहे.
या वेळी ग्रामपंचायत सदस्य , अंगवाडी सेविका , आरोग्य सेवक, ग्रामसेवक , सर्व ग्रामपंचायत टीम यांनी अती मोलाची कामगिरी केली.
तालुक्यातील जंगीपुरा येथे संविधान दिनाच्या दिवशी जंगीपुरा गावात जि.प. शाळेमध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याच प्रकारे विदयार्थ्यांचे रांगोळी स्पर्धा घेण्यात आली.
प्रथम कार्यक्रमाच्या अध्यक्षा श्रीमती रेखाबाई राजपूत ( उपसरपंच ) यांच्या हस्ते डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अपर्ण करून पुजन करण्यात आले.
भारतीय संविधान उद्देशिकेचे सामुहीक वाचन करण्यात आले.
सुत्रसंचालन श्रीमती मिनाक्षी बारबद मॅडम यांनी केले प्रास्ताविक श्रीमती सुजाता सुरवाडे मॅडम ( मुख्याध्यापक ) यांनी केले तसेच श्री एस आर निकम (से. नि.दुय्यम निबंधक ) यांचे व्याख्यान ठेवण्यात आले.
संविधाना बाबत (से.नि दुय्यम निबंधक)एस.आर निकम साहेब यांनी
शिक्षक ,पालक व ग्रामस्थ यांना संविधानाचा परिचय करूण देऊन संविधानिक मूल्ये , मुलभूत हक्क , कर्तव्य व जवाबदाऱ्या , संविधान आणि शिक्षण इ.विषयावर सविस्तर प्रबोधन केले.
जंगीपुरा गावात लसीकरणाचा पहीला डोस पूर्ण होऊन ९९% महिला राजच्या वतीने आज रोजी पार पाडण्यात आला.
याठिकाणी उपस्थित आशा वर्कर सीमा राजपूत , सरपंच मॅडम, उपसरपंच मॅडम , सदस्य व ग्रामसेवक शरद घोंगडे भाऊसाहेबयांचा ग्रॉमस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. कोविड19 लसीकरणा ठिकाणी गावातील बहूसंख्य नागरीक उपस्थित होते.
अशा प्रकारे जंगीपुरा ग्रामपंचायती मधील महिलाराजच्या वतीने लसीकरणाचा पहिला डोस 99%संपन्न झाला.