विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिस्ट हाँस्पिटलचे संचालक डॉ.सागर गरुड यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी डॉ. सेलच्या जिल्हाध्यक्ष पदी निवड
जामनेर/उपसंपादक-शांताराम झाल्टे
विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिस्ट हाँस्पिटलचे संचालक डॉ. सागर दादा गरुड यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी डॉक्टर सेलच्या जळगाव जिल्हाध्यक्ष पदी निवड करण्यात आली.
डॉक्टर सागर गरुड यांची उत्कृष्ट कामगिरी व हमेशा गरीबांसाठी सतत धाऊन मदतीस जाणे केव्हाही तत्पर राहून सेवाभावी मदत करणे अशा प्रकारे सागर दादांंची कामांची चर्चा होत आहे.
त्याच प्रमाणे आज डॉ. सागरदादा गरुड यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी डॉ. सेलच्या जळगाव जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती झाली आहे.
आज जिकडे तिकडे त्यांचे अभिनंदन केले जात आहे.व तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा तर्फे आंनदाचा वर्षाव होत आहे.
