मिरज/ प्रतिनिधी –अशोक मासाळ
दि हिंद एज्युकेशन सोसायटी मिरजचे न्यू इंग्लिश स्कूल सोनी या विद्यालयात आज दिनांक २३/१०/२०२१ रोजी सन 2021- 22 या शैक्षणिक वर्षातील दुसरी पालक सभा संपन्न झाली. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष रहीम येलुरकर होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व विविध विषयांवर ती १) विद्यार्थी उपस्थिती बाबत २) इयत्ता दहावी ज्यादा तपासाबाबत.
३) चाचणी क्रमांक एक बाबत या विषयांवरती श्री मासाळ सर यांनी सविस्तर चर्चा केली तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री वन मोरे सर यांनी आठवी एन एम एम एस स्कॉलरशिप बाबत व बँक पासबुक संदर्भात चर्चा केली.
अध्यक्षीय भाषणात रहीम येलुरकर म्हणाले पालकांचे पूर्ण लक्ष आपल्या पाल्याकडे असणे अत्यंत गरजेचे आहे.मुलांच्या हातामध्ये मोबाईल दिल्यानंतर मुलगा अभ्यासच करतो का याकडे सुद्धा पालकांनी लक्ष देणे गरजेचे आहे त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी कमीत कमी मोबाईलचा वापर करावा व अधिक वाचन करावे व लेखन करावे असे त्यांनी आपले मत मांडले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ डी एस पाटील मॅडम यांनी केले तर आभार जाधव सर यांनी मांडले.
अशा रीतीने इंग्लिश स्कूल सोनी या विद्यालयात खेळीमेळीच्या वातावरणात पालक सभा संपन्न झाली.