मिरज/प्रतिनिधी–संजय पवार
सांगली वेतन पथक अधीक्षकांच्या मनमानी कारभाराविरुद्ध शिक्षकेतर संघटना आंदोलन करणार असल्याचे सांगली जिल्हा शिक्षकेतर संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ सातपुते यांनी सांगलीतले. सांगली वेतन पथकाकडून माहे ऑक्टोबर 21 या महिन्याची महागाई भत्त्यासह वेतन बिल स्विकारण्यासाठी कॅम्पचे नियोजन केले आहे.
या कॅम्पला कोणत्याही पद्धतीचा ताळमेळ नाही . माध्यमिक लिपीकांना विनाकारण ताटकळत ठेवले जाते.
फायलीच्या ढिगाऱ्यामधून फाईल मिळण्यासाठी तास-तास हुडकावे लागते. फायली ठेवण्यासाठी मागणी करुन देखील कोणतेही रॅक अथवा स्वतंत्र व्यवस्था करण्यात आलेली नाही.
वेतन बिलेही ऑनलाईन असून देखील सर्व सिस्टिम ऑटोमॅटिक असून देखील आवश्यकता नसताना देखील अतिशय मायक्रो तपासणी नवीन मा.अधीक्षिका करमुसे मॅडमनी सुरू केली आहे. यामुळे अनावश्यक वेळ आणि मनस्ताप वाढलेला आहे. वेतनपथकामध्ये कोणत्या प्रकारची बैठकीची व्यवस्था नाही. फंडाची रजिस्टर्स , फाईली शोधण्यासाठी नाहक त्रास सहन करावा लागतो. अरेरावीचे प्रमाण वाढले आहे. दिलेले प्रस्ताव सापडत नाहीत. अशा असंख्य तक्रारी माध्यमिक शाळांतील लिपीकांकडून संघटनेकडे प्राप्त झालेल्या आहेत.
आज वेतन पथक अधीक्षिका मा. करमुसे मॅडम यांना जिल्हा संघटनेचे अध्यक्ष मा. रघुनाथ सातपुते सर यांनी फोन करून रविवारचा कॅम्प सोमवारी घेण्याबाबत विनंती केली. तसेच आम्ही आपणाकडे अडचणी सांगण्यासाठी व निवेदन देण्यास येणार आहोत असे सांगितल्यावर दिवाळीनंतर या असे सांगून भेट नाकारली. वेतन पथकाच्या या मनमानी प्रवृत्तीचा आम्ही तीव्र निषेध आणि धिक्कार व्यक्त करीत आमच्या लिपिक बांधवांनी कोरोना काळामध्ये देखील शाळेत इतर कोणताही कर्मचारीवर्ग नसताना रिस्क घेऊन शाळेचे कामकाज पाहिले. धोका पत्करला. परंतु याची कोणीच दखल घेत नाही ही खेदजनक बाब आहे.
आठवडाभर काम करून रविवारी कोणतेतरी घरगुती नियोजन असते . या कारणावरून रविवारी कॅम्प न ठेवता तो सोमवारी ठेवावा ही शुल्लक मागणी वेतन पथकाने नाकारली, याबद्दल संघटनेतर्फे नापसंती आणि निषेध व्यक्त करीत आहोत.
इथून पुढे वेतन पथकाने माध्यमिक लिपीकांकडून जास्त अपेक्षा ठेवू नयेत.
इथून पुढे माध्यमिक लिपिक वेतन पथकात नियमानुसारच कामकाज करतील याची नोंद घ्यावी .
कोणत्याही नियम पुस्तकांमध्ये फंडाचे रजिस्टर्स, ब्रॉडशीट भरणे , हिशोब करणे हे माध्यमिक लिपीकाचे काम नाही. तसेच वेतन बिले आपल्या ऑफिसात इनवर्ड पर्यंत सादर करणे एवढेच त्याचे काम आहे. तरी देखील आपल्या ऑफिसला सहकार्य म्हणून गेले कित्येक वर्षे वेतनपथक ऑफिसची कामे देखील माध्यमिक लिपिक पुर्ण करुन कामकाज पूर्तता करण्याचा आणि गैरसोय टाळण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु त्याची दखल घेतली जात नसेल आणि अरेरावीची भाषा होत असेल तर इथून पुढे माध्य. लिपीकांकडून मदतीची आणि सहकार्याची अपेक्षा ठेवू नये.
दिवाळीच्या तोंडावर जिल्हयातील मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची आर्थिक गैरसोय होऊ नये म्हणून या ऑक्टोबर बिलासाठी आम्ही प्रसंगी वेळेच्या बाहेर देखील कामकाज करून वेतन वेळेत होण्यासाठी निश्चित प्रयत्न करणार आहोत. कारण कोणत्याही कर्मचाऱ्यांची दिवाळी ही गोड व्हावी हि प्रामाणिक धारणा आमच्या संघटनेची आहे.
नाहीतर लिपिकांनी वेळेत बिले दिले नाहीत म्हणून ऑक्टोबरचे वेतन दिवाळीनंतर होईल हे सांगण्यास संबंधित प्रशासन मागेपुढे पाहणार नाही.वेळ पडल्यास ऐन दिवाळीत आंदोलनाच्या पवित्र्यात असल्याचे सांगण्यात आले. यासंदर्भात सर्व संघटनांची एक बैठक लवकरच घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
वेतन पथकाच्या मनमानी कारभाराविरुद्ध शिक्षकेतर संघटना आंदोलनाच्या पवित्र्यात.
