हिवरखेडा बु.जामनेर/बाळू पाटील या देशात आज पर्यंत समाजातुन दुर्लक्षीत राहीलेला जर कोणता वर्ग असेल तर तो वृत्तपत्र विक्रेता असुन आपला देश हा जगात सर्वात मोठी लोकशाही असलेला देशात लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेले वृत्तपत्र घरोघरी पोहचविणारा वृत्तपत्र विक्रेता आहे देशाचे राष्ट्रपती स्व . डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांच्या वाढदिवसाच्या दिवसी वृत्तपत्र विक्रेता दिन साजरा होण आपण सर्वांसाठी गौरवाची बाब आहे असे मनोगत जामनेर येथे संपन्न झालेल्या पहील्याच वृत्तपत्र विक्रेता संघटने बैठकीत शांताराम राठे पहुर यांनी व्यक्त केले . दरम्यान आज दिनांक १५ ऑक्टोबर रोजी जामनेर येथील पांडे लाँजीगय येथे संपन्न झालेल्या महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघाची बैठक देशाचे राष्ट्रपती स्व .डॉ .ए पी जे अब्दुल कलाम यांच्या वाढदिवसा निमित्ताने आयोजीत करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरूवातीस दिपप्रज्वलन करून राष्ट्रपती डॉ .ए पी जे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अपर्ण करून अभीवादन करण्यात आले . यावेळी बोलतांना विक्रत्यांनी आपले मत व्यक्त करतांना राष्ट्रपती डॉ.कलाम यांच्या बद्दल माहीती देतांना सांगीतले की देशाच्या सर्वोच्चपद राष्ट्रपती या पदावर विराजमान झालेले डॉ . अब्दुल कलाम यांनी सुद्धा लहानपणी वृत्तपत्र विक्री करून प्रगतीची शिखर गाठलीत . जामनेर येथे संपन्न झालेल्या या महाराष्ट्र राज्य वृत्तविक्रेता संघाचे बैठकीत वृत्तपत्र विक्रेत्यांच्या विविध समस्या व अडचणी संदर्भात चर्चा करण्यात आली . या बैठकीस जिल्हा उपाध्यक्ष राहुल सोनी जामनेर,जिल्हा सल्लागार शांताराम राठे पहूर, बाळू पाटील हिवरखेडा बु, सतिष बिल्हाडे तोडापूर, सुनील सोनी जामनेर, अतुल जैन जामनेर, मनोज माळी तळेगाव,समाधान पाटील फतेपुर, कासार शेंदूणी, सतीश सोनी, दीपक सोनी, अमोल भामरे, कुणाल पाटील, पंकज सेतवाल, वैभव पोळ, आदी वृत्तपत्र विक्रेते
जामनेर येथे देशाचे राष्ट्रपती स्व .ए .पी .जे अब्दुल कलाम यांच्या वाढदिवसा निमित्त वृत्तपत्र विक्रेता संघाची बैठक संपन्न
