लातूर /प्रतिनिधी-सोमनाथ काजळे
लातूर शहरातील औद्योगिक परिसरात असलेल्या जिजामाता विद्यालय लातूर येथे प्राचार्या सलीमा सय्यद यांच्या हस्ते भारतरत्न ,माजी राष्ट्रपती डाँ. एपीजे अब्दूल कलाम यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.त्यांची जयंती वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरी करण्यात आली.
जिजामाता विद्यालयाच्या प्राचार्या श्रीमती सलीमा सय्यद यांनी यावेळी स्वच्छतेचे नियम सांगितले व स्वच्छतेची शपथ दिली तसेच एखादे पुस्तक एखाद्याच्या आयुष्याला कलाटणी देऊ शकतं एक पान एखाद्याच आयुष्यबदलू शकत.एक वाक्य एखाद्याच ध्येय ठरवू शकत.एवढी ताकद वाचनात असते….चला मग आज पासून संकल्प करूया रोज एक पान तरी वाचू या..असे आवाहान कले. यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी फुलाच्या आकारात बसून अब्दूल कलाम यांच्या जीवनावर आधारित पुस्तकांचे वाचन केले व अविरतपणे पुस्तके वाचण्याचा संकल्प केला.
यावेळी विवेक भोसले,साक्षी इरले, आम्रता कुलकर्णी,श्रद्धा बिरादार,समिक्षा देशमूख,रिया अन्सारी,राजेश्री राऊत या विद्यार्थ्यांनीआँनलाईन मनोगत व्यक्त केले.
भारतरत्न एपीजे अब्दूल कलाम यांच्या जयंती निमित्त प्रमुख पाहुणे म्हणून माऊली शिक्षण संस्थेचे सचिव श्री.गंगाधर आरडले,श्री.रविंद्र पाटील ,सर्व शिक्षक, प्राध्यापक,शिक्षकेतर कर्मचारी व बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.