कोल्हापूर प्रतिनिधी- प्रा. डॉ. सौ. स्मिता सुरेश गिरी.

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म १४ एप्रिल १८९१ या दिवशी झाला.
१४ एप्रिल २०२०, मंगळवार हा दिवस सर्व भारतीय नागरीक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती म्हणून मोठ्या उत्साहात साजरे करतात.
आजही lockdown च्या काळात सतत आठवण येते ती संविधानाची आणि ते तितक्याच निरपेक्षतेने लिहीणार्या मितभाषी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची. पुनः भारतीय लोकशाहीच्या कसोटीचा काळ सुरू आहे. आजुबाजूची परिस्थिती पाहिली तर असे वाटते, की भारतीय लोकशाहीला भारतीय जनताच तर कारणीभूत नाही ना? स्वतंत्र भारतातील लोकशाहीविषयी
चिंतन करतांना डॉ. आंबेडकर म्हणाले होते की, ‘जोपर्यंत इंग्रज सरकार होते, तोपर्यंत आपल्या देशातील चांगल्या वाईट गोष्टीची
जबाबदारी आपण त्यांच्यावरच टाकत होतो.
सरकार बद्दलतीलही पण आपण स्वतंत्र झाल्यामुळे व स्वतंत्र असताना चांगल्या वाईट गोष्टीची जबाबदारी आपलीच राहणार आहे. त्यामुळे आपल्याला प्राप्त परिस्थिती मध्ये अधिक जबाबदारीने वागावे लागणार आहे.’
आज ही त्यांचे महान विचार तितकेच योग्य आहेत!.
अद्वितीय बुद्धिमत्ता, त्या आधारे स्वत: घेतलेले अति उच्च दर्जाचे शिक्षण;
जागतिक दर्जाची विद्वत्ता, बंडखोरी व क्रांतिकार्य करण्याची प्रवृत्ती,
संघटन कौशल्य; शिस्तबद्धता व नीटनेटकेपणा; वक्तृत्व; इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व; प्रचंड वाचन; संशोधनात्मक अभ्यास, अभ्यासपूर्ण व प्रेरणादायी लेखन, हजारो वर्षांची गुलामगिरी नष्ट करणारे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर, याना त्रिवार वंदन!’