कजगाव (प्रतिनिधी संजय महाजन)सध्या जगभरात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातलेला आहे भारतातही त्याची संख्या वाढतांना दिसून येत आहे केंद्र व राज्य सरकार प्रत्येक घटनेकडे लक्ष ठेवून आहेत महसूल आरोग्य पोलीस व इतर सर्वच प्रशासकीय विभाग कोरोना आजार वाढणार नाही याची गंभीरतेने दखल घेत आहे कोरोना च्या पाश्वभूमीवर कजगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने बाहेर गावाहून आलेल्या प्रत्येक नागरिकांची तपासणी करून घेत आहे व बाहेरगावाहून आलेल्या नागरीकांना आरोग्य बाबत विविध सूचना करण्यात येत आहेत वैद्यकीय अधिकारी व प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्वच अधिकारी व कर्मचारी व आशा हे जोमाने कामाला लागले आहेत त्यांनी आता पर्यंत पुणे मुंबई नाशिक व इतर शहरातून कजगाव व परिसरात येणाऱ्या चार दिवसांत तब्बल ७३१ लोकांची तपासणी केली आहे प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत गावातील नागरिकांनि घरातच थांबणे शासनाच्या आदेशाचे पालन करणे काम नसतांना कोणीही बाहेर निघू नये चुकीच्या अफवांना महत्व देऊ नये व रोग्य बाबत विविध सूचना दिल्या जात आहेत प्राथमिक आरोग्य केंद्राचे वाहन हे गावातील गल्लो गल्लीत फिरून लोकांना सतर्क करीत आहेत प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्वच यंत्रणा कामाला लागली आहे बाहेरून येणाऱ्या प्रत्येक नागरिकाने आपली आरोग्य तपासणी करून घ्यावी त्यांना योग्य ते सर्व सहकार्य केले जाईल आम्ही प्रत्येक घटनेवर बारीक लक्ष ठेवून आहोत कजगाव प्राथमिक आरोग्य केंद्रस्थरावरून बाहेरगावाहून गावात व परिसरात सर्वांना आरोग्या बाबत आवश्यक ते सहकार्य केले जाईल अशी प्रतिक्रिया कजगाव चे वैद्यकीय अधिकारी डॉ प्रशांत पाटील यांनी महाराष्ट्र माझा शी बोलतांना दिली
बाहेरून आलेल्या तब्बल ७३१ लोकांची प्राथमिक आरोग्य केंद्राकडून तपासणी
