गंगापूर तालुक्यातील नेवरगाव येथे अडविण्यात आलेल्या रस्त्यावर कमीत कमीत 200 हेक्टर क्षेत्रावर 50 शेतकऱ्यांची जमीन आहे.येथील शेतकरी मागील पंधरा वर्षांपासून या रस्त्यावर दरवर्षी पावसामुळे सदरील रस्त्यावर दोन फूट पाणी साचलेले असते, त्यामुळे रस्त्यात चिखल झालेला असतो,रस्त्याची दुरुस्ती करण्यासाठी मुरूम,दगड असे मटेरियल 50 शेतकऱ्यांनी पैसे जमवून मागविले होते.परन्तु दत्तात्रय पवार, अरविंद पवार गट नंबर 416 व गणेश पवार गट नंबर 397 या शेतकऱ्यांनी सार्वजनिक गट रस्त्यावर मुरूम टाकण्यास मज्जाव केला व रस्ता दुरुस्तीस अडथळा निर्माण केला.तरी सदरील रस्ता पोलिसांनी स्वतःच्या देखरेखीखाली पोलीस संरक्षणामध्ये सदरील रस्त्याची दुरुस्ती त्वरित करून द्यावी आणि लवकरच प्रशासनाने शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केलेली आहे.

योगेश मोरे, गंगापूर