औसा/प्रतिनिधी -ज्ञानेश्वर सूर्यवंशी.
आलमला – रामनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आलमला तालुका औसा येथे दिनांक 26 जानेवारी 2022 रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त विद्यालयात सकाळी ठीक 8.00वाजता रामनाथ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष एडवोकेट उमेश पाटील यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करण्यात आले त्यानंतर विद्यालयाच्या प्रांगणात सन 2020-21 मध्ये गुणवत्ता मिळवलेल्या एस.एस.सी, एच.एस.सी. व स्पर्धा परीक्षेतील गुणवंताचा व आदर्श शिक्षकांचा सत्कार समारंभ संपन्न करण्यात आला. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून विश्वनाथ बिराजदार चेअरमन वि.का.स. सोसायटी आलमला गावचे सरपंच कैलास निलंगेकर पोलीस पाटील सुरेंद्र पाटील संपादक महादेव कुंभार, तलाठी भागवत सोनवते संस्थेचे सचिव प्रभाकर कापसे, औसा पंचायत समितीच्या सभापती अर्चना गायकवाड, मुख्याध्यापिका सौ अनिता पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत गुणीजनांचा गावचे सुपुत्र मुंबई पोलीस किरण लांडगे यांच्या सौजन्याने दिलेल्या ट्राफि पुष्पहारचे सर्व गुणवंतांचा, उत्तम प्रशासन म्हणून मुख्याध्यापिका सौ अनिता पाटील यांचा तसेच आदर्श शिक्षक म्हणून पर्यवेक्षक आवटे ए.आय. प्राध्यापक अशोक कदम व सेवक जगन्नाथ अंबुलगे यांचा आदर्श कर्मचारी म्हणून मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष उमेश पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच प्रमुख पाहुणे श्री महादेव कुंभार यांनी गुणवंतांना पुढील जीवनासाठी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमात एस.एस.सी. परीक्षेतील गुणवंत कु. बिराजदार पल्लवी, कु. बेरुळे वैष्णवी, कु. गुंजोटीकर वैष्णवी, सरवदे अजय, चव्हाण बालाजी, एच. एस.सी. परीक्षेत कु.कांबळे धरती, कु. पवार आरती, तसेच शिष्यवृत्ती परीक्षेत मुलांनी सादिक, कु.मुलानी तनाज या गुणवंत विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रात मिळवलेल्या घवघवीत यशाबद्दल त्यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सर्वप्रथम विद्यालयाच्या वतीने सर्व मान्यवरांचे रामनाथ शिक्षण संस्थेच्या स्टाप च्या वतीने सत्कार करण्यात आला. या प्रसंगी सर्व विद्यार्थ्यांना भारतीय सविधानाची शपथ दिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री पी सी पाटील यांनी केले तर आभार अंबुलगे रंगनाथ यांनी मांडले. या कार्यक्रमास विद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचे पालक प्राध्यापक, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
रामनाथ विद्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त गुणीजनांचा सत्कार संपन्न
