देऊळगाव/प्रतिनिधी–किरण जटाळे
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देऊळगाव गुजरी येथून ३ किमी अंतरावर असलेले तोरनाळे येथे आज दि.२३ रोजी जि. प. शाळेमध्ये
इंग्रजी विषयाच्या
अध्यापनाचे नवनवीन कौशल्य आत्मसात करण्यासाठी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था जळगाव तसेच शिक्षण विभाग जामनेर यांच्या मार्गदर्शनानुसार प्रत्येक केंद्रात इंग्रजी विषयाची आवड असणाऱ्या शिक्षकांसाठी दर महिन्याला एक मीटिंग आयोजित केली जाते. या मिटींगमध्ये इंग्रजी विषयाच्या विविध कौशल्यांवर चर्चा ,मार्गदर्शन व प्रात्यक्षिक सादर केले जाते.
तोरनाळे केंद्रातील एकूण आठ शाळांमधील शिक्षकांसाठी इंग्रजी विषयाचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. यावेळी सुरुवातीला ऍक्टिव्हिटी बाबत मार्गदर्शन करण्यात आले. शिक्षकांनी या ऍक्टिव्हिटी मध्ये सक्रिय सहभाग घेऊन या ऍक्टिव्हिटी वर्गात कशा राबवता येतील याबाबत चर्चा केली. यानंतर लैंग्वेज डेव्हलपमेंट, लर्निंग बाय रेडींग, लर्निंग बाय वाचिंग, तसेच रिफ्लेक्शन व ॲक्शन प्लॅन याबाबत मार्गदर्शन करण्यात आले व ऍक्टिव्हिटी सादर करण्यात आल्या. टॅग कॉर्डिनेटर श्री सचिन जोशी सर यांनी मार्गदर्शन केले. केंद्रप्रमुख श्री प्रदीप जाधव सर यांनी ट्विटर वापराबाबत मार्गदर्शन केले. श्री शांताराम माळी सर, श्री विकास पाटील सर, श्री दिनेश महाजन सर ,श्री सोपान हुडेकर सर, श्री विरेंद्र बागल सर श्री खैरनार सर श्री अनिल वाघ सर, सौ विद्या जोशी मॅडम इत्यादी शिक्षकांनी सहभाग घेतला होता. पंचायत समिती जामनेर इंग्रजी विषय प्रमुख श्री जगताप सर ,शिक्षण विस्तार अधिकारी श्री विष्णू काळे साहेब तसेच गटशिक्षणाधिकारी श्री विजय सरोदे साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार सदर इंग्रजी विषयाचे प्रशिक्षण उत्साहात संपन्न झाले..


जिल्हा परिषद मराठी शाळांमध्ये अध्यापनात इंग्रजीचा प्रभावी वापर करण्यासाठी सदरच्या मिटिंग या अत्यंत उपयुक्त ठरतात. इंग्रजी अध्यापनाच्या नवीन टेक्निक ,स्किल यांचा प्रभावी वापर या प्रशिक्षणातून मिळतो. इंग्रजी बाबतचा आत्मविश्वास वाढतो व विद्यार्थ्यांमध्ये आवड निर्माण होते.