आ. गिरिषभाऊंचे तातडीची मदत कार्य...
जामनेर/उपसंपादक-शांताराम झाल्टे

लाकडाने भरलेला ट्रक जामनेरकडून भुसावळकडे भरधाव वेगाने जात असतांना  समोरून प्रवाशांनी भरलेली शिटर रिक्षाला जोरदार धडक दिल्याने अपघात झाला.
दरम्यान गारखेडा गावाजवळ भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने पॅजो रिक्षाला जोरदार धडक दिली असता. यात दोन जण जागीच ठार झाले असून दहापेक्षा जास्त प्रवासी जखमी झाले आहेत.
घटनास्थळी जामनेर पोलीस पोहचून रहदारीला बाजूला करून रूग्णांना रुग्णालयात दाखल केले आहेत व उपचारार्थ दोन मृत झाल्याची घटना घडली आहे.
यातील बाकी रूग्णांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना तातडीने जळगाव येथे हलविण्यात आले आहे.
अपघाताची माहिती मिळताच तालुक्याचे आमदार गिरीशभाऊ महाजन यांनी सुद्धा तात्काळ घटनास्थळी जाऊन अपघातग्रस्तांना तातडीची मदत केली. यावेळी गिरिषभाऊनी स्वतःच्या वाहनात व ऍम्ब्युलन्सच्या माध्यमातून रुग्णांना जामनेरच्या ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी रवाना केले.
रुग्णालयात गिरीशभाऊ परिस्थितीवर लक्ष ठेऊन असून, गरज असल्यास पुढील उपचारांसाठी रुग्णांना इतरत्र हलविण्यात येणार आहे.

पुढील तपास जामनेर पोलीस करीत आहे.