जामनेर/उपसंपादक-शांताराम झाल्टे                                     

जळगाव शहरात येत्या 12 डिसेंबर वार रविवार रोजी आदित्य लॉन्स येथे सरपंच परिषद मुंबई (महाराष्ट्र) जळगांव जिल्हा आयोजित जिल्हा सरपंच मेळावा व तसेच सत्कार समारंभाचे भव्य आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती जामनेर तालुका सरपंच परिषदेचे तालुकाध्यक्ष राजमल भागवत पाटील यांनी जामनेर पंचायत समिती येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दिली. जिल्ह्य़ातील प्रत्येक तालुक्या मध्ये उत्कृष्ट कार्य करून गावाचे नांव लौकिक करणार्‍या सरपंचांचा यथोचित सत्कार करण्यात येणार असुन जळगांव जिल्हा सरपंच मेळाव्यात सरपंच परिषदेच्या पदाधिकारी व सदस्य यांच्या संघटीकरणावर अधिक भर दिला जाईल. त्याच प्रमाणे परिषदेचे पुढिल ध्येय व धोरणे यांची योग्य नियोजन करून चर्चा होणार आहे. ऐतिहासिक असा मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
सदर या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे जिल्ह्य़ाचे पालकमंत्री तथा स्वच्छता व पाणीपुरवठा मंत्री ना. गुलाबराव पाटील व कार्यक्रमांचे अध्यक्ष माजी. मंत्री आ. गिरीश महाजन हे असणार आहे.या सत्कार समारंभाचे मुख्य आकर्षण राज्यातील आदर्श गांव योजनेचे कार्याध्यक्ष तथा हिवरेबाजारचे विद्यमान सरपंच पद्मश्री पोपटराव पवार हे सत्कार मुर्ती म्हणून आमंत्रित करण्यात येणार आहेत आहे. तसेच सरपंच परिषद मुंबई प्रदेशाध्यक्ष दत्ता काकडे व प्रदेश सरचिटणीस अॅड. विकास जाधव यांच्या सह जिल्ह्यातील खासदार रक्षाताई खडसे,उन्मेष पाटिल, आ. राजुमामा भोळे, आ. चिमणराव पाटील, आ. संजय सावकारे, आ. चंद्रकांत पाटील, आ. अनिल पाटील, आ. मंगेश चव्हाण, आ. शिरिष चौधरी, आ. किशोर पाटील, आ. लताबाई सोनवणे, आ. चंदुभाई पटेल, आ. स्मिता वाघ, माजी. जि. प. अध्यक्ष दिलीप खोडपे, रविंद्र भैय्या पाटील यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. पत्रकार परिषदेत जिल्ह्य़ातील सर्वपक्षीय आजी, व माजी, सरपंच, उपसरपंच तसेच सदस्य यांनी कार्यक्रमास आवर्जून उपस्थित राहण्याचे आवाहन तालुकाध्यक्ष राजमल भागवत पाटील यांनी केले. त्यावेळी जिल्हा समन्वयक युवराज पाटील, बाळु धुमाळ, श्रीकांत पाटील, बाळु चव्हाण, बाळू चवरे,आदी पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.