जामनेर/प्रतिनिधी-शांताराम झाल्टे
केकतनिभोंरा येथील रहिवासी तुषार पुडंलिक पाटील हे स्वतः एस.पी.युनिव्हर्सल सर्विसेस तसेच प्रायव्हेट लि.व एस.पी.टेक्नॉलॉजी चे प्रोप्रायटर,डायरेक्टर आहेत तरी यांनी आज रोजी एका काँन्ट्रक्टराची फसवणूक केली आहे अशी तक्रार काँन्ट्रक्टर अमोल दत्तात्रय चव्हाण यांचे भाऊ राहुल दत्तात्रय चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत उघडकीस आणले.
सविस्तर असे की तुषार पुंडलिक पाटील.व मनिषा तुषार पाटील यांनी ओ.एफ.सी अंडरग्रांऊड काम दिले होते पंरतू सदरचे काम हे लातुर,परभणी, बीड,उस्मानाबाद, बुलढाणा, जळगाव, धूळे या जागी दिले. वरील प्रोजेक्ट चे कामी अमानत म्हणून NEFT/RTGS रक्कम अंक्सीस बँकेमार्फत रू.७४,५०,०००असून व कँश रक्कम रू.४,००,००० अशी एकूण रक्कम ७८,५०,००० अमोल चव्हाण यांच्या कडून काँन्ट्रक्टच्या नावाखाली लिहून घेतले असून वारंवार राहुल चव्हाण यांच्या भावाला खोटे स्वरूपात लेखी करून घेतलेली रक्कम मी या दिवशी परत करनार असे सांगून राहुल चव्हाण यांच्या भावाची दिशाभूल सतत करत होता.
राहुल चव्हाणचे भाऊ अमोल चव्हाण यांनी आमदार गिरीषभाऊ महाजनंना हा प्रकार सांगितला असता आमदार गिरीषभाऊ महाजन यांनी कॉन्ट्रॅक्टदार ला बोलावून विचारपूस केली त्याच्या कडून नोटरी करून घेतली की या तारखेला राहुल चव्हाण यांच्या भावाची घेतलेली रक्कम परत कर अशी कबुली कॉन्टॅक्टदारने केली. की मी या तारखेला रक्कम परत देनार पंरतू वांरवार फोन लावुन हमेशा कट करत असल्याने राहुल चव्हाण यांचा भाऊ अमोल चव्हाण आज गेल्या सहादिवसा पासून बेपत्ता आहेत. व दोन्ही भांवाना जिवेठार मारण्याची धमकी तुषार पाटील यांच्या कडून येत आहे.
राहुल चव्हाण यांच्या भावानी घरी जाऊन हा प्रकार चिठ्ठी वर लिहून घर सोडून कुठे गेला आहे हे कोणाला माहीती नसल्याने सर्व परिवार परेशानी मध्ये आहे.
नेमके राहुल चव्हाण यांच्या भावाचे काय झाले असेल, भाऊ कुठे गेला की त्याच कोणी काही बरे वाईट केल तर नसेल हे अजून कळालेल नाही जामनेर पोलिस स्टेशन ला मिसिंग म्हणूण नोंद करण्यात आली.
भावाचा शोध जामनेर पोलिस करीत आहे.
तुषार पाटील यांनी भरपुर लोकांना नामांकीत व्यक्तीचे नाव सांगून तुमचे कामे करूण देतो असे सांगूण लोकांची फसवणूक करतो असे पत्रकार परिषदे सांगितले आहे आणि प्रमोद खामणकर हा नोटरी मधे साक्षीदार असून याला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला व तो उघडकिस आला आहे.
प्रमोद खामणकर हा रक्ताने भरलेला होता त्याला जळगाव शिवाय पर्याय नसल्याने त्याला राहुल चव्हाण यांनी जळगाव येथे ताबडतोब रुग्णालयात दाखल केले आहे.
प्रमोद खामंणकर याने जामनेर पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद केलेला आहे
राहुल चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत प्रतिक्रिया दिल्या त्याचप्रमाणे तुषार पुंडलिक पाटील कॉन्ट्रॅक्टर यांनी आमच्यावर दरोड्याचा खोटा आरोप करून गुन्हा नोंद केला आहे.
कॉन्ट्रॅक्टर चा खोटारडेपणा समोर आणावा अशा प्रतिक्रिया राहुल चव्हाण यांनी दिल्या.आणि लवकरात लवकर माझ्या भावाचा शोध घेऊन बाकी राहलेली रक्कम काँन्ट्रक्टदारा कडून मिळवुन द्यावी अशी अपेक्षा जामनेर पोलिसांकडून केली जात आहे.व सदरील खोटारड्या आरोपींवर कारवाई करण्यात यावी असे राहुल चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
लाँर्ड एस.पी. युनिव्हर्सल सर्विसेस व प्रायव्हेट लि.व एस पी.टेक्नॉलॉजीचे डायरेक्टर यांनी दिनदहाडे काँन्ट्रक्टरची केली फसवणूक राहुल चव्हाण व अमोल चव्हाण यांना जिवेठार मारण्याची धमकी दिली असता साक्षीदारावर केला हल्ला
