जामनेर/उपसंपादक-शांताराम झाल्टे
जामनेर तालुक्यातील शेंगोळे गावात अ.जा. नव बुद्ध समजाच्या (दलित वस्ती सुधार निधी) चालू वर्षा साठी मंजूर झालेला आहे तरी तेथील ग्रामपंचायत सरपंच बाई पती श्री दिलीप रदाल , उपसरपंच श्री संदीप साळवे, , ग्रामसेवक श्री कुमावत यांनी ..शेंगोळे येथील त् दलित वस्ती माहीत असतांना वार्ड क्रमांक १ चा निधी वार्ड क्रमांक 3 मध्ये जाणून-बुजून संगम मताने तिथे खर्च करण्यास ठरविले आहेत.
तरी ही माहिती दलित वस्तीच्या लोकांना ज्येष्ठ नागरिक तसेच अनुसूचित जाती चे सदस्य यांना कल्पना न देता त्यांनी तो पूर्ण खर्च करण्याच्या उद्देशाने तयारी केली.
याची तक्रार पंचायत समिती येथील बी.डी.ओ. कवडदेवी मॅडम यांच्याकडे केली असता विस्ताराधिकारी बैरागी पाहणी करून गेले परंतू
तक्रारदार व गावातील ज्येष्ठ नागरिक दलित वस्तीतील लोकांस कोणतीही कल्पना न करता पूर्वकल्पना न देता ,येऊन संबंधित सरपंच बाई पती दिलीप रडाल, उपसरपंच व ग्रामसेवक यांनी वार्ड क्रमांक 3 मध्ये दलित वस्ती आहे ही खोटी माहिती देऊन,संबंधित चौकशीसाठी वार्ड क्रमांक १ मधील
दलित वस्तीची पाहणीसाठी घेऊन आले विस्तार अधिकारी यांना सर्व माहिती सांगितल्यानंतर ठराव ग्रामपंचायत कार्यालय मध्ये सदस्यांच्या समोर तसेच गावातील दलित वस्ती नागरिकांच्या समोर खरी माहिती लिहिली व बी. डी. ओ. मॅडम यांना पुरवतो असे सांगून ते निघून गेलेत.
या सर्व बाबीची माहिती घेण्यासाठी दलित वस्तीतील नागरिक तसेच वार्ड क्रमांक एक मधील सदस्य श्री संजय दाभाडे, श्री समाधान मोकासरे ,श्री रमेश जोशी, यांनी पाठपुरावा करण्यासाठी मॅडम कडे यासंदर्भात अर्ज केला तरी यावर आता पर्यंत कोणत्याही प्रकारची कायदेशीर कार्यवाही करण्यात आलेली नसून त्यासंदर्भात विस्तार अधिकारी तसेच बी. डी. ओ. मॅडम यांच्याकडे गावातील नागरिक यांनी संदर्भात विचारणा केली.
या संदर्भात मॅडम यांनी स्पष्ट सांगितले की दलित वस्ती चे काम तर होणार तरी तुम्ही वार्ड क्रमांक ३ चा ठराव कॅन्सल करून वार्ड क्रमांक 1 मध्ये कामाचा ठराव मंजूर करावा तुमच्या वार्ड क्रमांक एक मधील अनुसूचित जाती चे सदस्य यांना कळवा काम सुचवण्यासाठी , मॅडमच्या सांगण्यानुसार वार्ड क्रमांक एक मधील अनुसूचित जाती चे सदस्य श्री संजय दाभाडे व इतर सदस्य यांनी ग्रामसेवक यांना मासिक मिटिग मध्ये ठराव विषय घेतला. तसेच १५ वित्त मधील येनारा निधी हा मागासवर्गीयासाठी, काँक्रीटीकरण रस्ता,१५५ लाख मागासवर्गीय येथे न खर्च करता दुसरीकडे खर्च करण्यात येत आहे.
ग्रामसेवकाचे उडवाउडवीची उत्तरे वांरवांर मिळत असल्याने येथील ग्रामस्थांचा वार्ड क्रमांक एक मध्ये दलित वस्ती असली तरी ही ते काम वार्ड क्रमांक 3 मध्ये होईल तुम्ही कोणाकडे ही जा आमचे काहीही करा ते काम वार्ड क्रमांक 3 मध्ये होईल अशा प्रकारची उत्तरे ग्रामसेवकाकडून जाणून बुजून सतत मिळत आहे.
वार्ड क्रमांक 1 मधील संजय बाबुराव दाभाडे,
शेंगोळे अनुसूचित जाती चे सदस्य तसेच ज्येष्ठ नागरिक तसेच गावातील प्रतिष्ठित व्यक्ती दलित वस्ती बाबतीत पाठपुरावा करीत आहे.
या सदर दलित वस्ती बाबतीत विषया अनुसरून माननीय कलेक्टर साहेब ,सीईओ साहेब तसेच माननीय बी. डी. ओ मॅडम यांनी कायदेशीर पद्धतीने कारवाई करावी आणि दलित वसतिगृहातील ग्रामस्थांना लवकरात लवकर न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करावा..अशी अपेक्षा शेंगोळा गावातील सदस्य व नागरिकांकडून होत आहे.
जामनेर तालुक्यातील शेगोंळे ग्रामपंचायत चा भोंगळ कारभार-स्थानिक नागरिकांची तक्रार
