विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी विविध धर्माचा अभ्यास केला. जगात बौद्ध धम्म हाच मानवतावादी धम्म असलेल्याने हाच धम्म अंगीकारला

–भिक्खू सघसेना महाथेरो


औरंगाबाद /प्रतिनिधीयोगेेश मोरे

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल इतिहास सांगावा तितका थोडाच आहे.देशाला त्यांनी परिपुर्ण अशी राज्य घटना दिली.डॉ. ते महान गाडे अभ्यासक होते.विषमता व जातीयत्ता संपवण्यासाठी आपल्या लेखनीतुन त्यांनी प्रयत्न केले.त्यांनी समता, बंधुत्व आणण्यासाठी शिका संघटीत व्हा आणि संघर्ष करा असा गुरू मंत्र दिला.असे भिक्खू संघसेना महाथेरो (प्रेसिडेंट,महाबोधी इंटरनॅशनल मेडीटेशन सेंटर,लेह-लद्दाख.) यांनी (ता.१९) शुक्रवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ पाली अँन्ड बुथ्दीझमच्या विद्यमाने आयोजित सोळावी अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद ता.सोयगाव जि.औरंगाबाद मध्ये उपस्थित १०००० बौद्ध उपासिकांना धम्मदेसना देतांना सांगितले ते पुढे म्हणाले की मानवाने तन आणि मन शुद्ध ठेवायचे असेल जगात बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रचार करुन शांतीचा मार्ग आत्मसात करावा लागेल असेही धम्मदेशना देतांना सांगितले.

यावेळी मंचावर भदन्त बोधीपालो महाथेरो,चौका,भदन्त धम्मसेवक महाथेरो (मुळावा),भदन्त शरणानंद महाथेरो,पाथरी,भदन्त अंगोलीमाल शाक्यपुत्र महाथेरो,जालना,भदन्त विशुध्दानंद बोधी महाथेरो, औरंगाबाद, भिक्खू डॉ. ज्ञानदीप महाथेरो, नागपुर, भिक्खू काश्यपायन महाथेरो जयशिंगपुर, भिक्खू डॉ.प्रा.एम.सत्यपाल महाथेरो, औरंगाबाद, भिक्खू एस.प्रज्ञाबोधी महाथेरो,मावसाळा औरंगाबाद, भिक्खू इंदवंश महाथेरो औरंगाबाद, भिक्खू सुगतबोधी महाथेरो, औरंगाबाद, भिक्खू करुणानंद महाथेरो, औरंगाबाद, भिक्खू देवेंद्र थेरो,श्रावस्ती, भिक्खू ज्ञानरक्षीत थैरो, औरंगाबाद, भिक्खू पय्यारत्न थेरो,हिंगोली, भिक्खु थम्मबोधी थेरो, औरंगाबाद, भिक्खू हर्षबोधी थेरो, औरंगाबाद, भिक्खू पय्यानंद, लातूर, भिक्खू धंम्मशिल,बिड, भिक्खू बोधिधम्मा,धम्माचल उपस्थित होते. तर राजकीय विचार मंचावर राज्याचे महसूल तथा ग्रामविकास राज्यमंत्री ना. अब्दुल सत्तार,राज्याचे पाणी पुरवठा राज्यमंत्री ना. संजय बनसोड, डॉ. संस्थेचे अध्यक्ष एस.पी.गायकवाड, सिल्लोडच्या नगराध्यक्षा राजश्री निकम,पुण्याचे डीवायएसपी प्रविण मोरे, माजी पंचायत समिती सदस्य विजय तायडे,साप्ताहिक आपले ज्ञानपंख वृत्तपत्राचे मुख्य संपादक दशरथ एन.सुरडकर,कार्यकारी संपादक विजय पगारे, उपसंपादक प्रविण तायडे दैनिक दिव्य मराठीचे उपसंपादक श‌ेखर मगर पत्रकार भरत पगारे, पत्रकार शरद दामोधर,पत्रकार विजय चौधरी,पत्रकार सागर भुजबळ,पत्रकार जब्बार तडवी,पत्रकार सचिन राठोड, आदी हजर होते. या धम्म देसना देतांना भिक्खू संघदेसना महाथेरो म्हणाले की, अजंठा लेणी ची निर्मिती इ.स.पुर्व दुसऱ्या शतकात झाली. अजिंठा लेण्याचा अगदी प्राचीन उल्लेख इजिप्त मधील अलेक्झांडेरिया येथील प्रसिद्ध भूगोल वेत्ता टॉलमी याने ‘साजन यग’या नावाने केलेला आढळतो. कार्ला, भाजा, कान्हेरी, नाशिक, पितळखोरा, वेरूळ आणि अजिंठा ही प्राचीन भारतातील व्यापारी दळणवळणाच्या राज्यमार्गावर बसली होती त्या मार्गाला सार्थवाहपथ असे म्हणले जात असे चंद्रगुप्त मोर्याने गांधार प्रदेश जिंकून मगर राज्याला जोडल्यावर अशोकाच्या काळात या परदेशात बुद्ध धम्माचा चांगला प्रसार झाला चंद्रगुप्त मौर्य (इ.स.पूर्व ३२४ ते. इ.स.पूर्व ३००) त्यांचा नातू सम्राट अशोक (इ.स.पूर्व२७४ते इ.स.पूर्व२३२) ह्यांच्या साम्राज्यात महाराष्ट्राचा समावेश होता. सम्राट अशोकाच्या आठव्या आणि नवव्या धम्मज्ञनेचे शिलाखंड ठाणे जिल्ह्यातील सोपारा येथे सापडले आहेत. सोपा राही मोऱ्यांची प्रतीक राजधानी होती.सुतनिपातातील पारायण वग्गावरुन धम्म प्रचारक भिक्खूंमुळे आणि व्यापा-यामुळे तथागत ह्यात असतांनाच बुद्ध धम्माचा प्रवेश महाराष्ट्रात झाला.इ.स.पूर्व चौथ्या शतकात वैशाली येथे दुसरी धम्म संगिती भरली होती. अपरांत देशातून आठ अर्हंत आणि अवंती व दक्षिणापथ या देशातून अठ्याऐंशी अर्हंत यशाचे निमंत्रण स्विकारून वैशाली गेले. बुद्ध धम्माचे मते मूळ शुद्ध स्वरूपात राहावीत त्या धम्माचा प्रचार होण्यासाठी उपाय योजना करावी. असे दोन मुख्य उद्देश ती संगिती भरण्यामागे होते. तेल मोग्गलीपुत्ततिस्सानै जय भिक्खू त्रिपिटकात निष्णात होते, अशा एक हजार विद्वान भिक्खूंना निवडून शुद्ध स्वरूपात धम्म लिहून काढण्यास सांगितले हे काम नऊ महिने चालले होते. तिसऱ्या धम्मा संगतीची म्हणजे धम्मा प्रचारासाठी निरनिराळ्या देशात पाठविण्यात आलेले धर्मोपदेशक होत. त्यात ‘महारठ्ठ महाधम्म राक्खीत थेर नाम कमू’ म्हणजे महाधम्म रक्खिताला. महारठ्ठ नावाच्या देशात कार्तिक महिन्यात पाठवले असा उल्लेख आहे. इ.स.पूर्व तिसऱ्या व चौथ्या शतकात महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर बुद्ध धम्माचा प्रचार झाला होता. मोर्यांच्या आणि सात वाहनाचा काळ महाराष्ट्राच्या इतिहासातील सुवर्णकाळ होता. त्या वेळच्या वाढलेल्या अधिक संपत्ती चा अविष्कार म्हणजे महाराष्ट्रात निर्माण झालेले कला कौशल्याने युक्त असे अनेक बुद्ध विहार योगाचाराचा तत्ववेत्ता असंग आहे दिवस अजिंठा लेणी येथे राहत होता. योगाचार तत्वज्ञानाला विज्ञान वाघ असेही दुसरे नाव आहे. त्या तत्वज्ञानात चित्त किंवा विज्ञान म्हणजे जाणीव हीच फक्त सत्य गोष्ट आहे. हे तत्त्व मांडले आहे. अजिंठा लेणी येथील चित्रकलेची उपासना जवळ जवळ एक हजार वर्ष अव्याहत चालली होती. तेथून मध्यप्रदेशातील बाघा, दक्षिणेतील बदमी, सिग्रिया, पित्तनवसाल मध्ये आशियातील बामियान, तिबेट आणि चीन देशातील तुन-हुअएंग येथे तिचा प्रचार झाला. अजिंठा बुद्ध लेणी येते शिल्पकला आणि चित्रकला शिकवण्याचे विद्यालय होते. डॉ.भाऊ दाजी यांनी अजंठालेणी येथील काही लेण्यांच्या शिला लेखाचे भाषांतर केलेले आहे त्यावरून दिसून येते. सम्राट अशोक मगधराज बिंदुसार यांचे पुत्र आणि मौर्यवंशाचे संस्थापक सम्राट चंद्रगुप्त मोरयाचे नातू होते. अशोकाचा आजोबा चंद्रगुप्त मौर्य जगातील इतिहासात पहिला सम्राट होता. प्रसिद्ध विद्वान एच.जी.वेल्स यांनी त्यांचे पुस्तक ‘द आऊट लाईन ऑफ हिस्ट्री’या पुस्तकात सम्राट अशोका बद्दल आपले मत व्यक्त केले आहे. इतिहासात गर्दी वाढवणारे हजारो सम्राट आणि करोडो राजांच्या मध्ये इतिहासाचे पाने भरलेले आहेत, परंतु आपली स्वतःची महानता आणि शालीनतेच्या कारणाने अशोकाचे नाव इतिहासात चमकत आहे.वोल्गा नदीपासून ते जपान पर्यंत तार्‍या प्रमाणे एक अशोकच चमकत आहे. त्यांचे नाव आजही सन्मानपूर्वक घेतले जाते. अशोकाची गुणवत्ता आणि स्मृती आजही मोठ्या प्रमाणावर आयुष्याच्या हद्यात साठवलेले आहे. समाज आणि देश सेवेमध्ये अविरत सर्व लोक, बुद्धिजीवी, राज्यनिती तज्ञ, जनप्रतिनिधी आणि शासनाध्यक्ष सर्वांसाठी सम्राट अशोक अनुकरणीय आहे.राजा सम्राट अशोक एकमेव आहेत की, त्यांनी बुद्ध शासनाचा जगभर प्रसार आणि प्रसारित करून विश्वगुरूचा दर्जा प्राप्त करून दिला. आजच्या युवा पिढीने अशा शक्य, सफल, सशक्त सुयोग आणि मानवतावादी सम्राटा आ पासून प्रेरणा घेऊन उद्योग केला तर भारत परत एक वेळ विश्व क्षितीजावर सूर्याप्रमाणे उदयमान होऊन विश्वाला अवलोकिक करेल. पाश्चात्य विद्वानात विटर निद, बदफु, फॅझबॅल,प्रिन्सेस,कर्ज शोम,औल्डनबर्ग,पौसिन,देवी,श्चरबास्की आद्वितील दाम्पत्य व्हिसा डेव्हिडस यांनी बौद्ध धम्मावर केलेले ग्रंथलेखन आणि संशोधन कार्य अलौकिक आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्मदीक्षा अगोदर भारतात ठराविक बौद्ध विचारवंत व दार्शनिक होते. धम्मानंद कोसंबी, राहुल संस्कृत्यायन, अनागरिक धम्मपाल जगदीश काश्यप, डॉ. भदन्त आनंद कौसल्यायन, भदन्त धर्मरक्षित यांचा नामोल्लेख येतो, त्याचा धागा धरून ऐतिहासिक वारसा जतन करण्याच्या पवित्र हेतूने अजिंठा लेणी च्या पायथ्याशी उपरोक्त संस्थेच्या विद्यमानाने जनतेच्या दान देणगी मधून थोडी थोडी करून ७४ एकर जमीन संस्थेने उपासकांच्या श्रद्धाबळावर विकत घेऊन खरेदी केली आहे.सन २००६ पासून या ठिकाणी दरवर्षी कार्तिक पौर्णिमेला सातत्याने अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद भरवण्यात येते अखंड दगडात तथागत बुद्धांची ३२ फूट उंच ध्यानस्थ मूर्ती बसवण्यात आली असून सहा खोल्या व २०×७० चे एक मोठे संतागार निर्माण केले आहे नदीपर्यंत रस्ता व पूल तयार झालेला असून भविष्यात बुद्ध विहार, विपश्यना केंद्र, व पाली भाषेचे विश्वविद्यालय निर्माण करणारच असा सम्यक संकल्प केलेला आहे असेही भिक्खू संघसेना महाथेरो यांनी धम्मदेसनेत सांगितले.या धम्म परिषदेचा लाभ दहा हजारवर बौद्ध उपासकांनी घेतला.

बौद्ध धम्म परिषदेत कायदा व सुव्यवस्था अबादीत रहावी म्हणून औरंगाबाद जिल्हयाचे कर्तव्यदक्ष ग्रामीण पोलीस अधिक्षक गोयल यांच्या आदेशान्वये सिल्लोड उपविभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. विजय मराठे,फर्दापूर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल मोरे यांनी चोख बंदोबंद ठेवला या धम्मपरिषदेमध्ये फर्दापुरचे पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक युवराज शिंदे,यांनी रक्तदान केले या परिषदेला पोलीस कर्मचारी भरत पाचोळे, पोलीस हवालदार सचिन काळे, बळीराम काकडे, . कुलथे मॅडम, संजय तेली, कृष्णा गवळी, पोलीस अंमलदार प्रदीप पवार, गणेश रोकडे, सचिन केंद्रे, महिला पोलिस कॉन्स्टेबल प्रियंका बोडखे आदींनी चोख पोलिस बंदोबस्त बजावला.

*लेह (लद्दाक) जम्मु काश्मीर येथुन विशेष या धम्म परिषदच्या कार्यक्रमाला आलेल्या गायिका *जीगमेत पलडोन* यांनी या कार्यक्रमामध्ये डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच सुंदर भिम गीत गायलं जीगमेत पलडोन त्यांच्या आवाजाने धम्मपरिषद मंत्रमुग्ध झाली होती त्या गायिकेचे सर्वांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत केले.