वाहनधारकां कडून प्रसन्न तेचे वातावरण जामनेर/उपसंपादक-शांताराम झाल्टे गेल्या काही महिन्यां पासून जामनेर-ते भुसावळ रस्त्याची चाळण झाली होती पण स्थानिक ठेकेदाराच्या वतीने रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामाने वेग घेतला आहे। उत्कृष्ट दर्जा च्या कामामुळे रस्त्याने वापरणाऱ्या वाहनधारकां मध्ये वाहन चालवतांना कुठलेही अडथळा न येता वाहनचालकांना आपले टू व्हिलर असो या अथवा फोर व्हिलर असो किंवा मोठे वाहन असो चालवतांना सोपे झाले आहे. त्यामुळे वाहनचालकांमध्ये समाधानी दिसून येत आहे.
जामनेरहून भुसावळ कडे जातांना गंगापुरी या गावापर्यंत रस्त्याची अवस्था बिकट झालेली होती यामुळे या रस्त्यावरून दिवस रात्र वापरणाऱ्या दुचाकी स्वार, तसेच चारचाकी वाहनांना तारेवरची कसरत करावी लागत होती.सणासुदीच्या काळात कुठल्याही प्रकारचा अपघात होऊ नये,सर्वांना आनंद उपभोगता यावा हा उदात्त हेतू डोळ्या समोर ठेऊन जामनेर येथील स्थानिक ठेकेदारानी काम हाती घेऊन कामाला सुरुवात केली आहे.अवघ्या दोन ते तीन दिवसात निम्म्याहून अधिक रस्त्याचे काम पूर्ण केलेले असून आहे.आपल्या कामाला वेग दिल्याने रस्त्याचे काम पूर्णत्वास केले आहे. रस्त्याच्या झालेल्या कामामुळे जामनेर ते भुसावळ कडे जाणाऱ्या वाहनांचा प्रवास अत्यंत सोपा झाल्याने वाहन धांरकामध्ये एक आंनद निर्माण दिसून येत आहे. स्थानिक ठेेकेदाराने लवकर काम चालू केल्याने ठेकेदाराचे कौतुक केले जात आहे
जामनेर ते भुसावळ रस्त्यांचे दुरुस्ती केल्याने स्थानिक ठेकेदाराची उत्कृष्ट कामगिरी
