पत्रकार- सुभाष भोसले
महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध देवस्थान ज्योतिबा च्या पायथ्याशी वसलेले आई महालक्ष्मी च्या पदस्पर्शाने पावन झालेली करवीर नगरी येथील वाडीपीर या छोट्याशा गावचे तीन सूपुत्र व एक सुकन्या या चौघांनी नेपाळ (पोखरा) येथे झालेल्या राष्ट्रीय युवा खेळ (नॅशनल युथ गेम) मध्ये विशाल निकम यांच्या मार्गदर्शनाखाली सुवर्णपदक मिळवून गावाचे नाव उज्वल केले.
काही दिवसापूर्वी नेपाळ मधील पोखरा येथे 14 वर्षाखालील राष्ट्रीय युवा कबड्डी स्पर्धेत वाडीपिर मधील साईराज दत्तात्रेय वाडकर व विश्वजीत प्रवीण चव्हाण या दोघांनी अतिशय चिकाटीने व जिद्दीने यश घेतले व सुवर्णपदकाचे मानकरी ठरले.
याच बरोबर नेपाळ पोखरा येतेच दुसरीकडे सुरू असलेली 19 वर्षाखालील राष्ट्रीय युवा खेळ धावणे (running) स्पर्धेमध्ये पंकज हिंदुराव पाटील व सानिका दिनकर जाधव या दोघांनी उत्कृष्ट धाव घेत सुवर्णपदक मिळवले. याबद्दल वाडीपीर ग्रामपंचायतीकडून शाल, श्रीफळ, फेटा देऊन अतिशय दिमाखात मिरवणूक काढण्यात आली.
यावेळी सरपंच आकाशी लाड, उपसरपंच उत्तम शेळके, ग्रामसेवक निलेश कुंभार, पत्रकार सुरेश राठोड ,ग्रामपंचायत सर्व सदस्य, सर्व ग्रामस्थ आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वाडीपिराचे चौघे राष्ट्रीय सुवर्णपदक मानकरी
