लातूर/प्रतिनिधी- सोमनाथ काजळे
17 ऑक्टोंबर पासून राज्यभर प्रवास करत असलेल्या मौर्य क्रांति संघ आयोजित
धनगर समाज जागृती परिवर्तन यात्रा आज निलंगा येथे आगमन झाले असता सकल धनगर समाज निलंगा च्या वतीने परिवर्तन यात्रेचे जंगी स्वागत करण्यात आले
अखंड हिंदुस्थानचे युगपुरुष राजे यशवंतराव होळकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त यशवंतराव होळकर यांच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले या परिवर्तन यात्रा मध्ये क्रांती संघाचे महासचिव श्री प्रतापराव पाटील, विभागीय अध्यक्ष श्री सत्यवान दुधाळ तसेच श्रीमती अरुणा पाटील, श्रीमती कोमल ताई दुधाळ, व शिवशंकर बोरसे यांचे निलंगा येथे आगमन झाले असता सकल धनगर समाजाच्या वतीने नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे ज्येष्ठ पत्रकार झेटिंगअण्णा मेहेत्रे वसुंधराताई शिंगाडे,निलंगा तालुका भाजपा ओबीसी अध्यक्ष नामदेव काळे ,बळवंत सरवडे प्रकाश सराटे ,सुरेश होळकर नंदकुमार सूर्यवंशी, गंगाराम सुर्यवंशी , दामोदर कोकरे,विजयकुमार वगे, शांतेश्वर पाटील,शैलेश वजीर, मधुकर गोबाडे ,बब्रुवान डोंगरे, भगवान वरवटे ,मोहन सोनटक्के आदि समाज बांधव उपस्थित होते. कार्यक्रमात बोलत असताना मौर्य क्रांति संघाचे महासचिव म्हणाले की धनगर समाजाला राजा चंद्रगुप्त मौर्य,अशोक सम्राट, अहिल्यादेवी होळकर, मल्हारराव होळकर व यशवंतराव होळकर यांची गौरवशाली परंपरा लाभलेली असुन धनगर समाजामध्ये जागृती परिवर्तन करण्यासाठी राज्यभर मौर्य क्रांति संघ प्रवास करत असुन 21 नोव्हेंबर रोजी जेजुरी येथे होत असलेल्या तिसऱ्या राज्यस्तरीय धनगर जागृती परिषद मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित राहण्याचे आवाहन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री बळवंत सरवडे यांनी केले तर आभार प्रदर्शन माने सर यांनी केले.
मौर्य क्रांती संघाच्या परिवर्तन यात्रेचे निलंगा येथे जंगी स्वागत
