मिरज /प्रतिनिधी -अशोक मासाळ
सोनी केंद्रातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांचे शिक्षण परिषद आज दिनांक 25 10 2021रोजी क्रांतिवीर दत्ताजीराव पाटील माध्यमिक विद्यालय सोनी येथे संपन्न झाले या शिक्षण परिषद साठी सोनी केंद्रातील प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाचे सर्व मुख्याध्यापक तसेच पंचायत समिती मिरज च्या सौ प्रतिज्ञा सावंत मॅडम उपस्थित होत्या.
या शिक्षण परिषदेचे प्रास्ताविक व सर्व मुख्याध्यापकांचे स्वागत केंद्रप्रमुख मा. यादव सर यांनी केले.
आजच्या शिक्षण परिषद मध्ये विविध विषयांवर चर्चा करण्यात आली होती ती पुढीलप्रमाणे—–
१) माझेविद्यार्थी माझी जबाबदारी या परिपत्रकात चे वाचन व शाळेतील अंमलबजावणी याबाबत सविस्तर मार्गदर्शन श्री पिसे सर यांनी केले तर बालरक्षक शाळाबाह्य विद्यार्थी वयानुरूप प्रवेशित विद्यार्थ्यांचे शिक्षण व शिक्षक प्रशिक्षण या विषयावर सौ रिजवाना नदाफ मॅडम यांनी अतिशय उत्कृष्ट पद्धतीने मार्गदर्शन केले.
२) स्वाध्याय व उपक्रमाचा आढावा व मार्गदर्शन पंचायत समिती मिरज बीआरसी च्या सौ सावंत मॅडम यांनी मार्गदर्शन केले त्याच प्रमाणे गोष्टीचा शनिवार याविषयावर सौ अश्विनी कुंभार मॅडम यांनी सोप्या भाषेत मार्गदर्शन केले.
३) समावेशित शिक्षण ग्रह मार्गदर्शन अवश्य असणाऱ्या बहुविकलांग मुलांचे व्यवस्थापन संदर्भात मार्गदर्शन सौ प्रज्ञा कुलकर्णी मॅडम यांनी केले तसेच सरल नोंदणी संचमान्यता व विद्यार्थी आधार रजिस्ट्रेशन यावरती श्री स्वामी सर यांनी अचूक मार्गदर्शन केले.
शेवटी या शिक्षण परिषद साठी उपस्थित असलेले सर्व मुख्याध्यापकांचे सर्व शिक्षकांचे शिक्षिकांचे आभार खोत सर यांनी मानले अशा तऱ्हेने खेळीमेळीच्या वातावरणात शिक्षण परिषद संपन्न झाली.
सोनी केंद्रातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांचे शिक्षण परिषद क्रमांक एक सन 2021- 22 कार्यक्रम संपन्न.
