मिरज /प्रतिनिधी -अशोक मासाळ

येथील गांधी सेवाधाम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये कॅरम प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न झाले.
डोंगरी , दुर्गम , जंगल भागातील विद्यार्थ्यांना कॅरम खेळाचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण मिळावे या उद्देशाने विद्यालयात कॅरम प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते. यावेळी झालेल्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना कॅरमचे क्रीडा प्रशिक्षक मोहसीन नदाफ म्हणाले जगभरातील अनेक देशात हा खेळ खेळला जात असुन शासकीय शालेय क्रीडा स्पर्धेमध्येही या खेळाचा समावेश आहे. मानसिक ताणतणाव , थकवा घालविण्यासाठी उपयुक्त असणारा हा खेळ मनाची एकाग्रता वाढवणारा आहे. नोकर भरतीसाठीही हा खेळ फायदेशीर असून ग्रामिण भागातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या खेळात सहभागी होऊन करीअर घडवावे असे आवाहनही त्यांनी केले. विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिका सह कॅरमचे नियम , स्पर्धां गट इत्यादी माहिती सांगण्यात आली.विद्यालयाचे मुख्याध्यापक आर. एस. हसबनीस यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले.यावेळी कॅरम चे राष्ट्रीय खेळाडू संकल्प कांबळे , साहिल बागल उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन क्रीडा विभाग प्रमुख सुधीर बंडगर यांनी केले. ए. डी . भाष्टे यांनी सुत्रसंचालन केले. आर एम. पाटील यांनी आभार मानले. आर. डी. देसाई यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.यावेळी सर्वं विद्यार्थी , शिक्षक , शिक्षकेतर कर्मंचारी उपस्थित होते.