प्रतिनिधी- सुभाष भोसले
श्री .शाहू हायस्कूल, ज्यूनिअर कॉलेज, कागल येथे शनिवार दिनांक 16 ऑक्टोंबर रोजी इयत्ता बारावी विज्ञान शाखेची पालक सहविचार सभा संपन्न झाली. प्राचार्य जे. डी .पाटील, उपप्राचार्य बी. के. मडिवाळ व पालक प्रतिनिधी यांचे हस्ते प्रतिमा पूजन झाले .
कार्यक्रमाचे प्रास्तविक प्रा. व्ही. एस. बाचुळकर यांनी केले कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य जे डी पाटील यांनी पालकांशी हितगूज केले .ज्यूनियर कॉलेज विभाग प्रमुख उपप्राचार्य बी .के .मडिवाळ यांनी शिक्षक-पालक जबाबदारी, कर्तव्य या बाबत मनोगत व्यक्त केले तसेच विज्ञान विभागातील प्रा. व्ही.बी. आलदर , प्रा सौ .व्ही एस. चौगुले यांनी मनोगत व्यक्त केले .प्रा. बी .एम .साळवी यांनी आभार मानले व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा .सौ .डी. पी. सावंत यांनी केले.
या वेळी बारावी विद्यार्थ्यासाठी वैयक्तिक मार्गदर्शन, विज्ञान शाखेसाठी सीईटी मार्गदर्शन , गुणवत्ता वाढ , विदयार्थी उपस्थिती या विषयावर चर्चा झाली .
श्री. शाहू हायस्कूल ज्युनिअर कॉलेज कागलमध्ये पालक सभा संपन्न
