औसा/प्रतिनिधी- ज्ञानेश्वर सूर्यवंशी
शिक्षक काॅंग्रेस औसा संघटनेच्या वतीने लेखाधिकारी बालाजी चव्हाण व कर्मचारी श्री.उल्हास बिराजदार श्री.समाधान पवार यांचा औसा तालुक्यातील निवड श्रेणी च्या 35 सेवा पुस्तिका पडताळणी करून दिल्याबद्दल शिक्षक काँग्रेस औसा शाखेच्या वतीने स्वागत करण्यात आले.
यावेळी तालुकाध्यक्ष दयानंद बिराजदार यांनी मनोगत व्यक्त करताना चव्हाण साहेब व त्यांची टीमचे अभिनंदन केले व यापुढेही शिक्षकांचे कामे तातडीने करण्याची अपेक्षा व्यक्त केली. यासाठी शिक्षक काॅंग्रेस तालुकाध्यक्ष दयानंद बिराजदार, काकासाहेब ठोके,मोहन सावंत यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला होता.
याप्रसंगी जिल्हा सरचिटणीस सुरेश सुडे, जिल्हा कार्याध्यक्ष संजय बिरादार, जिल्हा उपाध्यक्ष अमोल राठोडे, कार्यालयीन सचिव काकासाहेब ठोके, तालुकाध्यक्ष उपाध्यक्ष चंद्रकांत तोळमारे, तालुकाध्यक्ष उपाध्यक्ष शिवाजी चव्हाण, तालुकाध्यक्ष उपाध्यक्ष मोहन सावंत, तालुका संघटक दयानंद वायदंडे आदि उपस्थित होते.