जामनेर(उपसंपादक)शांताराम झाल्टे
आज दि.11रोजी हिवरखेडा तवा येथे ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले असून ग्रामसभा यशस्वी पार पाडण्यात आली. सविस्तर असे की या वेळी ग्रामपंचायती मधील सरपंच माया प्रशांत अहिरे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या ग्रामसभचे सचिव म्हणून ग्रामसेवक अतुल महाजन यांनी काम पाहिले, असता या ग्रामसभेचे सूत्र संचालन सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर जगताप यांनी केले.
सुरवातीला ग्रामसेवक अतुल महाजन यांनी सभेचा अजेंडा वरील विषय सर्वा समोर वाचून दाखवले सदरील विषय हे गावाच्या सर्वागीन विकासा साठी असून हे विषय पूर्ण पणे सोडवण्याच्या दृष्टीने ग्रामस्थांना आश्वासन दिले सामाजिक कार्यकर्ते म्हणून से.नि.पी.एस आय युवराज अहिरे यांनी सर्वानुमते हिताचे प्रश्न सभेस मांडून सर्वाना त्या विषयाचे महत्व पटवून दिल्याने ही ग्रामसभा अगदी खेळी मेळीच्या वातावरणात नव्या तरुण पिढीला आदर्श देणारी ठरली .
सभेस प्रधान मंत्री घरकुल योजनेतून प्रत्येक वंचित लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ मिळावा व हिवरखेडा तवा गावात जलजीवन मिशन अंतर्गत आराखडा तयार करण्यात आला ,तसेच 15 वित्त आयोग योजने अंतर्गत सन2020-2021 अरखड्यावर चर्चा करण्यात आली,महात्मा गांधी तंटामुक्त समिती गठित करण्यात आली ग्रामस्थांनी सर्वानुमाते तंटामुक्त अध्यक्ष गौतम सुरवाडे यांची निवड करण्यात आली तसेच ग्रामस्थानी त्यांच्या समस्या मांडल्या रोजगार हमी योजने अंतर्गत विहीर योजना,जनावराचा गोठा,फळ बाग या मध्ये सर्वानुमते लाभार्थ्यची नावे घेण्यात आली
या ग्राम सभेला ग्रामपंचायत सदस्य उपसरपंच तसेच गावातील प्रतिष्टीत नागरिक अमीर तडवी, से.नि.पी.एस आय युवराज अहिरे ,मंगलसिंग पवार,बबन गोसावी, मेहबूब तडवी, संतोष पाटील,,जनार्दन कुमावत, धनसिंग पाटील, छकिल तडवी,विजय अहिरे, श्यामराव पाटील,नागेश्वर पाटील, नितेश गोसावी,रतन पाटील,गौतम सुरवाडे, अरविंद पाटील,रामदास बोऱ्हाडे,जंगलू अहिरे,अक्षय सुरवाडे,सुभाष अहिरे,रमेश सौदागर,बुद्धभूषण सुरवाडे,संदीप सुरवाडे,सचिन कुमावत, गोपाल कुमावत, कालिदास पाटील, शरद सुरवाडे,नावलसिंग पाटील,जगन गोसावी, तसेच अशा सेविका साधना ताई पाटील यांच्या सह बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.
ग्रामपंचायत ग्रामसभेला गाल बोट लागू नये म्हणून पोलीस अंमलदार देशमुख साहेब व गावचे पोलीस पाटील पांडुरंग अहिरे यांच्या नियंत्रणाखाली बंदोबस्तात ग्रामसभा खेळी मेळीच्या शांततेच्या वातावरणात पार पडली
