सातारा/प्रतिनिधी – सचिन ठणके

फलटण:मुंजवडी ता.फलटण येथील ग्रामपंचायतीस कोरोना महामारीच्या काळात उत्कृष्ट काम बदल ज्ञान संकल्प सामाजिक संस्था तर्फे देण्यात आलेला पुरस्कार संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे व पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष रमेशआप्पासाहेब थोरात यांच्या हस्ते मुंजवडी ग्रामपंचायतला कोव्हीड योद्धा गुणगौरव पुरस्कार 2021 देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
मुंजवडी ग्रामपंचायतने 2020-21या वर्षात कोरोना महामारी काळात जि.प.प्रथमिक शाळा मुंजवडी येथे कॅरनटाईन सेंटर उभारणी केली होती.या कॅरनटाईन सेंटर ला अनेक मान्यवरांनी अर्थिक मदतीचा हात दिला होता.या कामाची दखल घेऊन ज्ञान संकल्प सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य दौंड यांच्या कडून मुंजवडी ग्रामपंचायतला कोव्हीड योद्धा गुणगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.त्यामुळे मुंजवडी गावच्या सरपंच सौ.स्वती कदम व माजी उपसरपंच श्री.कुंडलिक कदम, ओम खोलेश्वर पॅनलचे गटनेते कमलाकर ठणके गुरुजी,माजी सरपंच दिलीप ठणके पाटील गामसेवक विलास डंगाणे,,माजी सरपंच हनुमंत आटोळे,सदस्य बापूराव ठणके पाटील,माजी तंटामुक्ती अध्यक्ष.सचिन वाघमोडे,माजी चेअरमन उत्तम माळवे,उद्योजक मधुकर रणदिवे,पदवीधर संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन ठणके पाटील,सदस्य बेबीताई घाडगे,सदस्य उषा येडे,सदस्य निर्मला रणदिवे,गजानन गाडवे आदीसह मान्यवर उपस्थित होते.मुंजवडी गावाला कोव्हीड योद्धा गुणगौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल गावातील ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे.