साम्रोद/प्रतिनिधी-अतुल मेढे . रेणुका माता देवस्थान च्या वतीने सालाबाद प्रमाणे यंदा ही पारंपारिक पद्धतीने आईची घटसथापना दिनांक ०७/१०/ २०२१ गुरुवार ते १५/१०/२१ पर्यंत (आईची घटस्थापना पासून ते दसरा पर्यंत) नवरात्रोतसव साम्रोद ता. जामनेर जि. जऴगाव येथे भक्तिभावाने साजरी करण्यात येणार आहे.आई रेनुका माता नवरात्रोतसव संपुर्ण परिसर पाऊसामुळे हिरवे गार असून, प्रवेश द्वार ते मंदिरा पर्यंत रोशनायी असते, माते जवळ रांगोळी काढली जाते, आईची मुर्ती सुंदर पद्धतिने सजवलेले व नटवलेली असते, त्यात मुर्ती चे रुप तेजस्वी व आकर्षक दिसुन येते.
कार्यक्रमाची रुपरेषा खालील प्रमाणे आहे:
गुरुवार ०७/१०/२१ रोजी दुपारी २:०० वाजता घटसथापना व महा आरती हरिजागर गावठण ग्रामस्थ मंडळ करणार आहे. दररोज ९ दिवस सकाळी ८ ते ९ व सायं ८ ते ९ वाजता महाआरती जागर होणार असुन महाप्रसाद चा लाभ भाविकांना मिळणार आहे. तसेच प्रतेक ग्रामस्थ मंडळा तर्फे हरिजागर,भजन,कीर्तन असे विविध कार्यक्रम नवरात्रोतसवात साजरे होणार आहे, ह्यात गावठण,पांडुरंग नगर प्रगति नगर,अशा प्रतेक ग्रामस्थांन तर्फे नवरात्री चा कार्यक्रम साजरे करण्यात येणार आहे.
श्री. शिवाजी भाऊ पाटील भजन सम्राट, स्वर गंध बुवा भजनी मंडळ साम्रोद ता.जामनेरच्या वतीने भजन साजरे केले जाणार आहे. दुर्गा अष्टमी निमित्त मंदिरात होम हवन सकाळी १० वाजता होणार असुन शुक्रवार १५ रोजी दुपारी ३:०० वाजता बळीदान व विसर्जन होणार आहे. असे विविध उपक्रम राबविले जाणार आहे.
या कार्याला विशेष सहकार्चे अध्यक्ष शिवाजी भाऊ पाटील, प्रकाश तेली,
शरद पाटील, अवधूत ठाकरे, बाबू वानखेडे,भोला पाटिल, गजानन निकम, प्रकाश इंगळे, गजानन बावस्कर, यांचे सहकार्य लाभले जात आहे. संपूर्ण कार्यक्रम शासनाचे नियम पालन करून भक्तिभावाने, शिस्त पद्धतीने होणार आहे याची दखल समस्त ग्रामस्थ गावकरींकडुन घेतली जाणार आहे. असे गावातील सरपंच माननीय सौ.रूपाली ताई पाटील व रेनुका माता देवस्थान चे अध्यक्ष शिवाजी भाऊ पाटील यांनी सांगितले आहे. तरी सर्वांनी आईचे दर्शन व तिर्थ प्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.आई रेनुका माता की जय.