संजय जटाळे यांना पाचव्या दिवशी आयुक्त कार्यालय कडून लेखी आश्वासन पत्र
देऊळगाव/प्रतिनिधी-किरण जटाळे
जामनेर – तालुक्यातील देऊळगाव गुजरी येथील संजय जटाळे यांनी 2 ऑक्टोंबर गांधी जयंतीच्या दिवसापासून देऊळगाव गुजरी येथील ग्रुप ग्रामपंचायतीच्या अनागोंदी (भोंगळ) कारभाराबाबत जिल्हाभरात सर्व ठिकाणी तक्रार अर्ज करून सुद्धा न्याय मिळत नसल्यामुळे त्यांनी विभागीय आयुक्त कार्यालय गाठून नाशिक या ठिकाणी आमरण उपोषण मांडले होते. या आमरण उपोषणाला पाचव्या दिवशी आयुक्त कार्यालयाकडून लेखी आश्वासन पत्र मिळाल्याने संजय जटाळे यांनी आयुक्त कार्यालयाच्या लेखी आश्वासन पत्राचे मान ठेवले असून आपले उपोषण तूर्त मागे घेतले आहे. आपले उपोषणाला विराम देऊन संजय जटाळे हे नाशिक वरून घरी परतले असताना त्यांचे ग्रामस्थांकडून गावात स्वागत करण्यात आले. या ठिकाणी उपस्थित महिला संघटनेच्या अध्यक्षा निर्मलाताई शिंदे, राजमल हजारी चव्हाण,विजय सिंग राजपूत, (सेवानिवृत्त शिक्षक) डॉक्टर मदन सोनार, मोरसिंग गोपा राठोड, नबाब तडवी, जवरसिंगभाऊ राठोड, महेंद्रसिंह ठाकूर, जितेंद्रसिंह राजपूत, सुभानभाऊ तडवी, परमेश्वर जवरे, युनुस पिंजारी, भूषण वाणी व इतर सर्वजण हजर होते.
गावातील ग्रुप ग्रामपंचायती मधील असणाऱ्या घोटाळा बाबतीत नाशिक येथे आमरण उपोषण मांडणारे कर्त्यांचे देऊळगाव ग्रामस्थांनी केले स्वागत
