मिरज:- संजय पवार
खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक सहकारी पतसंस्था व शिक्षक महासंघाच्यावतीने सेंसरची सॅनिटायझर मशीन जि. प. शिक्षण विभागाला भेट देण्यात आली.
यावेळी खाजगी प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत चर्चा करण्यात आली. यामध्ये वरिष्ठ व निवड श्रेणीचे प्रलंबित प्रस्ताव प्रशिक्षण अभावी प्रलंबित आहेत. यासाठी पुढील महिन्यात प्रशिक्षण आयोजित करणार असल्याचे सांगण्यात आले.
त्याचबरोबर वैद्यकीय परिपूर्तीच्या बिलांबाबत महासंघाच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्याचे मान्य केले आहे.
प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला पगार होण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगून, कोणतीही कामे प्रलंबीत ठेवणार नाही, असे आश्वासन महासंघाच्या पदाधिकार्यांना दिले.
राज्यात सर्वात अगोदर सांगली जिल्ह्यामध्ये खाजगी प्राथमिक शिक्षक महासंघाच्या पुढाकाराने खाजगी प्राथमिक शाळा सुरू झाल्याबद्दल खाजगी प्राथमिक शिक्षक महासंघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे हार्दिक अभिनंदन केले, तसेच जिल्ह्यातील सर्व खाजगी प्राथमिक शिक्षकांना धन्यवाद दिले.
सर्वांनी विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन करुन, खाजगी प्राथमिक शिक्षक महासंघाच्या कार्याचे कौतुकही शिक्षणाधिकारी श्री संजय राठोड साहेब यांनी केले.
यावेळी शिक्षक महासंघाचे जिल्हाध्यक्ष श्री अरविंद गावडे, राज्य हिशोब तपासणीस श्री मु.न. तांबोळी, उपाध्यक्ष डी. बी. कांबळे, हिशोब तपासणीस महेश सपकाळ, महिला प्रमुख सौ.अश्विनी गोरे, मनपा क्षेत्र व तालुकाध्यक्ष युवराज वायदंडे, सचिव बाबासाहेब माने, प्रसिद्धीप्रमुख अमोल राठोड, न्यू प्रायमरी स्कूल कुपवाडचे मुख्याध्यापक श्री कुंदन जमदाडे, शिक्षकेतर प्रमुख लहू पवार, जिल्हा सदस्य हणमंत बोंदर इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते._
महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक शिक्षकेतर महासंघ शाखा सांगली जिल्ह्याचे वतीने प्राथमिक शिक्षणाधिकारी श्री संजय राठोड साहेब यांचे आज स्वागत करण्यात आले
