मिरज (संजय पवार):- 9 ऑगस्ट या क्रांती दिनी विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य कायम विना अनुदानित शाळा कृती समिती मार्फत ढोल/ घंटा बजाओ आंदोलन सुरू केले असून संघटने मार्फत पुढील मागण्या केल्या आहेत शासनाच्या पूर्वीच्या प्रचलित नियमानुसार 100 टक्के अनुदान मिळावे, महाराष्ट्रातील अंशतः अनुदानित 20℅, 40℅ अघोषित, त्रुटी पूर्तता केलेल्या अपात्र असणाऱ्या सर्वच शाळांना 100 टक्के अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात यावा यासाठी आज मा शिक्षणाधिकारी माध्यमिक विष्णू कांबळे यांना निवेदन देण्यात आहे यावेळी राज्याध्यक्ष खंडेराव जगदाळे, जिल्हाध्यक्ष संतोष जत्ते, मनोहर चव्हाण प्रमोद पाटील विलास खांडेकर संदीप काळे सुनील शिंदे अर्जुन जाधव चिखले सर कोकरे सर बागुल सर तशी बाग गोजे काळे मॅडम व असंख्य विनाअनुदानित शिक्षक शिक्षिका हजर होते.या आंदोलनास शिक्षक भारती सांगली जिल्हा संघटनेने जाहीर पाठींबा दिला. यावेळी शिक्षक भारती जिल्हाध्यक्ष सुधाकर माने, महेश शरनाथे, अशोक मासाळ सुरेश संकपाळ, संतोष चौगुले सुरेश संकपाळ हजर होते.