कोल्हापूर (प्रतिनिधि प्रा.सुरेश डोणे)कोरोना रोगाच्या वाढत्या प्रभावामुळे खबरदारीचा उपाय म्हणून शासनाने लॉकडाऊनचा निर्णय घेतला आहे.त्यामुळे सर्वांना घरीच थांबावे लागले आहे. लॉकडाऊन आणि वैशाख वणवा यामुळे लोक चांगलेच अडचणीत आले आहेत. पण काल झालेल्या पावसाने वातावरणात सुखद गारवा निर्माण केला आहे.
काल सायंकाळी ५ च्या सुमारास सुळकूड (ता.कागल) परिसरात विजांचा लखलखाट, वादळी वारे याचबरोबर गारांसह पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडून वीजसेवा खंडित झाली आहे.तर काहीं ठिकाणी घरांचे छप्पर उडून गेल्याचे निदर्शनास आले आहे.