पाचोरा (प्रतिनिधी कुंदन बेलदार):-येथील कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील किसान शिक्षण संस्थेच्या भातखंडे माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांसाठी स्टडी फ्रॉम होम या उपक्रमांतर्गत विद्यालयातील तंत्रस्नेही ज्येष्ठ शिक्षक श्री.बी.एन. पाटील व संदीप सोनवणे, सह विद्यालयातील सर्व शिक्षक बंधू आपल्या विषयानुसार वर्गनिहाय विद्यार्थ्यांना स्टडी फ्रॉम होम यानुसार विद्यार्थ्यांच्या पालकांना संपर्क करून कोरोना विषाणू संदर्भात माहिती देऊन कोरोना विषाणू पार्श्वभूमीमुळे संपूर्ण देश लॉक डाऊन आहे. शासनाने कोरणा विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना म्हणून शाळांना २० मार्च २०२०पासून सुट्टी जाहीर केली आहे. कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव अधिक वाढल्यामुळे वार्षिक परीक्षा देखील रद्द करण्यात आल्या आहेत. परंतु अचानक दिल्या गेलेल्या सुट्ट्यांमुळे शाळेतील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक बाबीचा विचार करून अभ्यासक्रमातील पाठयांश देऊन याबाबत पालकांना जाणीव जागृती करून. विद्यार्थ्यांनी घरीच थांबावे आणि कोरूना विषाणू पासून बचावासाठी पालक व विद्यार्थ्यांना सूचना दिल्या आहेत. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना त्यांच्या वर्गानुसार शिक्षक व आप – आपल्या विद्यार्थ्यांचा व्हाट्सअप ग्रुप तयार करून विद्यार्थ्यांना विषय निहाय शिक्षक ऑनलाइन अभ्यास घेत आहे. जेणे करून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही. व विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर कुठलाही परिणाम होणार याची काळजी शिक्षक घेत आहेत . या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना फायदा होत असुन तसेच ज्या विद्यार्थ्यांकडे व्हाट्सअप मोबाईल नाही अशा विद्यार्थ्यांच्या पालकांना फोन करून विद्यार्थ्यांना अभ्यास दिला जात आहे. तसेच दिलेला अभ्यास विद्यार्थी पूर्ण करतो किंवा नाही हे देखील तपासून घेतले जात आहे. यासाठी शाळेतील शिक्षक आय जे पाटील, एन यु देसले ,एस बी भोसले, आर यु राऊळ, ए एस पाटील, एस जे सैदाणे, संदीप पाटील हे परिश्रम घेत आहे. या अभिनव उपक्रमासाठी संस्थेचे चेअरमन नानासाहेब प्रतापराव हरी पाटील , संचालक दादासाहेब प्रशांत पाटील(अव्वल सचिव मंत्रालय मुंबई) ,संचालिका डॉ पुनमताई पाटील, मुख्याध्यापक सुनील पाटील, यांचे मार्गदर्शन लाभत आहे. विद्यार्थ्यांना स्टडी फ्रॉम होम हा उपक्रम राबवला जात असल्याने ग्रामीण भागातील पालक वर्ग कमालीचे खुश झाले असून त्यांनी उपक्रमशील शिक्षकांचे मनापासून अभिनंदन व कौतुक होत आहे.
भातखंडे विद्यालयात शिक्षक घेत आहेत व्हाट्स अॅप ग्रुपद्वारे विद्यार्थ्यांचा आॅनलाईन अभ्यास
