शिराळा (प्रतिनिधी मनोहर कांबळे):-मांगरूळ येथे उंच च्या उंच डोंगर रांगा आहेत .येथे उंच झाडे झुडपे यांनी हा परिसर सदैव हिरवागार नटलेला असतो.तसेच भरपूर प्रमाणात गवत ही सापडते .उन्हाळ्यात मात्र पाण्याच्या कमतरतेमुळे मोठ्या प्रमाणावर झाडाची पाने व गवत वाळले जाते .पावसाळ्यात गवत चांगले येण्याच्या लोकांच्या गैर समजुतीमुळे लोक डोंगराला आग लावतात .
या डोंगराला अशीच आग लागली तेव्हा वेळीच आग आटोक्यात आणण्यासाठी वनरक्षक प्रकाश पाटील यांनी त्या ठिकाणी धाव घेतली ,त्यांच्या सोबत पोलीस पाटील सादिक मस्के ,अमर पाटील संजय पाटणकर आदींसह माजी ग्रामपंचायत सदस्य सुधीर कुंभार घटनास्थळीपोहचले .आग आटोच्यात आणण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले .आग आटोक्यात आल्याने थोड्या अंशी तरी जंगली जीव जंतू चे ,वन्य पशूंचे प्राण वाचले.
शिराळा तालुक्यातील मांगरूळ येथील डोंगर रांगांणा लागली आग
