कोल्हापूर (सुभाष भोसले) सध्या करोनो विषाणू सावट असल्याने सर्व शाळांना सुट्टी जाहीर झाली. पण विद्यार्थ्यांना करमेना संचार बंदी असल्याने बाहेर फेरणे कठीण झाले आहे.त्यामुळेघरांतच टिव्ही, मोबाईल, किंवा घरातच खेळात येणारे खेळ खेळत आहेत. पण संध्या उन्हाळ्याचे दिवस असलेल्या पक्ष्यांने देखील पाण्याचा शोध घ्यावा लागत आहे. वैभव आडके यांनी मुलांना समोर ही संकल्पना मांडली करनूर गावचे माजी संरपच बाळासो चौगुले यांच्या घरामागे फळांची झाडे आहेत यावेळी रुपेश चौगुले, भुषण चौगुले, कुणाल गुदले, संकेत गुदले,पाश्वनाथ चौगुले यांनी रिकाम्या पाण्याच्या बाटल्या शोधून त्यांझाडाला आडकून त्यांना पिण्यासाठी पाणी व खाण्यासाठी तांदूळ उपलब्ध करुन दिले आहेत. उपक्रम जरी छोटासा असाला तरी लहान मुलांना सामाजिक कामाची आवड निर्माण करण्यासाठी प्रेरक आहे.