कोल्हापूर (प्रतिनिधी संजय पाटील)कोरोनाची खबरदारी म्हणून राज्यात सर्वत्र संचारबंदी करण्यात आली आहे.कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकार खबरदारी घेत आहे. राज्यात कोरोना विषाणूच्या नियंत्रणासाठी करावयाच्या उपाययोजना विषयी प्रसिद्ध करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये सुधारणा सुधारणा करण्यात आली असून नव्या धोरणानुसार येत्या २० एप्रिलपासून वर्तमानपत्रांना टाळेबंदीतून वगळण्यातून आले आहे.मात्र वृत्तपत्रांचे घरोघर वितरण करण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत.
राज्यात टाळेबंदी जाहीर करण्यात आल्यापासून खबरदारी म्हणून काही अपवाद वगळता राज्यातील सर्वच वर्तमानपत्रांनी छपाई करणे आणि वितरण करणे थांबवले होत.राज्याने प्रसिद्ध केलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये वर्तमानपत्रांना ताळेबंदीतून वगळण्यात आले ; मात्र घरोघरी होणाऱ्या वितरणावर बंदी घालण्यात आली आहे. राज्यातील सर्व विभागाच्या आयुक्तांना तसेच संचालनायतील संचालकांना कार्यालयात उपस्थित राहण्यास नव्या सुधारनेनुसार सांगण्यात आले आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी केंद्र सरकारने ३ मे पर्यंत टाळेबंदी जाहीर केली आहे.जनतेची अडचण लक्षात घेऊन२०एप्रिलपासून काही बाबींना या टाळेबंदीतून सूट देण्यात आली आहे.त्यासंबंधीची एकत्रित मार्गदर्शक सूचना १७ एप्रिल रोजी जाहीर करण्यात आली आहे.यामध्ये आज दुरुस्ती करण्यात आली आहे.त्यामध्ये काही बाबींचा नव्याने समावेश करण्यात आला आहे.या संबंधीचे परिपत्रक काढण्यात आले आहे.त्यानुसार राज्यातील मुद्रित माध्यमांना या ताळेबंदीतून वगळण्यात आले आहे. मात्र कोरोनाच्या प्रसाराचे प्रमाण पाहता वर्तमानपत्रे व मासिकांचे घरोघरी वितरण करण्यास मनाई करण्यात आली आहे.तसेच मंत्रालयीन सर्व विभागाच्या आयुक्तालयातील आयुक्त ,संचालनालयातील संचालक यांनी १०% कर्मचाऱ्यासह कार्यालयात उपस्थित राहावे.असे निर्देश सरकार कडून देण्यात आले आहेत.