कोल्हापूर प्रतिनिधी:- प्रा. डॉ. सौ. स्मिता सुरेश गिरी

फोटोसाठी समाधानाचे, आनंदाचे, भाव आणण्यासाठी हजारो रिटेक दिले व पैसे दिले तरी तसे हवं भाव अनमोल आहेत व कृत्रिमरीत्या ते चेहऱ्यावर येत नाहीत कारण समाधान हे तुमच्या अंतर्मनाचे प्रतीक असते. हा असाच
फोटो एका मजुरी करणाऱ्या कुटुंबाचा आहे , जो लॉकडाऊनमध्ये काम बंद झाल्याने दिल्लीतून आपल्या खेडेगावात पायी चालत जात आहे.
रस्त्यात एक परिवार आपल्या कारने जात असताना या कुटुंबावर नजर पडली. कारमधील कुटुंबाला यांचे परिश्रम पाहवले नाहीत आणि त्यांनी खाण्या-पिण्याच्या दृष्टीने काही मदत देऊ केली.
मजुर महिलेने संकोचत नकार दिला. तिच्या पतीने पण “ताई आमच्याजवळ पुरेसे आहे , तुम्ही अन्य कोणाला तरी द्या” असे म्हणत नकार दिला. छोट्या मुलांपैकी एकाने संकोचत विचारलंच , ” बिस्किटे आहेत का” ? कारमधील कुटुंबाने त्या मुलांना बिस्किटे दिली आणि निघुन गेले.
या मजुर कुटुंबाचे परिश्रम बघा. . . . . रोजगार बंद , हातात थोडेच पैसे शिल्लक , डोक्यावर पुर्ण संसारोपयोगी साहित्य , शेकडो किलोमीटरचा पायी प्रवास , चार लहान लहान मुले . . . .
पण पती-पत्नीच्या चेहऱ्यावर करोडो रुपये खर्चून खरेदी न करता येणारं हास्य ……ते काय म्हणतात ना “हंड्रेड मिलियन डॉलर स्माईल”. आणि संयोग बघा त्या महिलेच्या डोक्यारील पिशवीवर लिहिलंय “संतुष्टि” आणि पुरुषाच्या डोक्यावरील पिशवीवर लिहिलंय “गुडटाइम”. या आव्हानात्मक काळाला सुद्धा आव्हान देत व्यक्त होत आहे. अदभुत!
१ तीळ सात जनांच्यात वाटून खाणारी भारतीय संस्कृती, हिंदुस्थान झिंदाबाद!