शिराळा (प्रतिनिधी मनोहर कांबळे)तालुक्यातील अंत्री धरणातील पाणीसाठा कमी झाल्याने शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.कडक उन्हाळा सुरु झाल्याने धरणातील पाणीसाठा झपाट्याने कमी होऊ लागला आहे.या धरणाचे पाणी मांकरवाडी शिरशी निगडी आंबेवाडी या गावांना मिळते.हे धरण तालुक्याच्या उत्तरेला असल्याने उत्तर भागात या पाण्याचा वापर मोठया प्रमाणावर केला जातो .गेटचे काम नादुरुस्त असलेने उपसा सिचन मधून पाणी सोडता येत नाही. तरी गेट दुरुस्तीचे काम एप्रिल माहिण्याअखेर पूर्ण झाल्यावर वाकूर्डे उपसा सिचंन योजनेचे पाणी धरणात सोडले जाईल व जल साठा पूर्ववत होईल .तालुक्यातील २७ पाझर तलाव कोरडे पडले आहेत .२२ तलावातील पाणीसाठा २०टक्के पेक्षा कमी झाला आहे .कूपनलिकांचीही पाण्याची पातळी खाली गेली आहे.