कोल्हापूर ,संजय पाटील
भुसावळ येथील खरादे सरांचा उपक्रम;औषधी वनस्पतीची लागवड
..एका रात्रीत एखादा माणूस निसर्गाची विस्कटलेली घडी ठीक करू शकत नाही. पण प्रत्येकाने आपापला खारीचा वाटा ओळखून सातत्याने कार्यास सुरूवात केली की काही काळाने त्याचा एकत्रित परिणाम निश्चितपणे दिसून येतो असाच एक प्रयत्न महाराणा प्रताप विदयालयाचे शिक्षक रवींद्र खरादे करीत आहेत .त्यानी आपल्या परस बागेत दुर्मिळ अशा वनस्पती ची लागवड केली आहे .
. शहरात राहून सुध्दा निसर्गाची व वृक्षसंवर्धनाची ओढ त्याना स्वस्थ बसू देत नाही आता तर कोरोना च्या लाॅकडाउन मुळे मिळालेल्या वेळेचा सदुपयोग ते परस बागेत दुर्मिळ अशा आयुर्वेदिक वनस्पती ची वनराईच त्यानी तयार केली त्यात एखंड,अळू, अंबेहळद, कढीपत्ता, गवतीचहा, अडूळसा,कोरफड, नागवेल, पानफूटी लिंबू इ.तर फुल झाडा मध्ये सोनचाफया पासून तर तर वेली गुलाब पर्यंत विविध फुलझाडापर्यत विविध वनस्पती चे संवर्धन केले आहे .
वृक्षरोपनाचा सपाटा
तसेच मातृभूमीत आपल्या शेतात आपल्या भाऊ अनिल खरादे च्या निगराणीत तीनशे लिंबू च्या झाडांची बागच फुलवलेली आहे व शेताच्या बांधांवर पर्यावरण पूरक कडूलिंब , आंबा, बेहडा, शेवगा, बांबू ची लागवड केली आहे.यांचे अजून एक वैशिष्ट्य असे की सर दरवर्षी पावसाळ्यात विद्यार्थी तसेच मित्रपरिवारात वृक्षलागवड व संवर्धनाचा संदेश देवून वृक्ष लागवडीसाठी प्रवृत्त करतात. आजी आजोबांनी सांगितलेल्या गोष्टी,त्यानी अनुभवलेली दुष्काळाची परिस्थिती ,त्यातूनच मिळालेली प्रेरणा घेऊन सर दरवर्षी पावसाळ्यात मोकळ्या जागेत रस्ता च्या कडेला गायरानात कमीतकमी दहा वृक्ष स्वत लावतात व त्यांचे संगोपन करतात
